esakal | Corona Update : उस्मानाबादेत दिवसभरात २०८ पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या ४ हजार ६३० वर  
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

उस्मानाबाद तालुक्यामध्ये ५७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील ४५ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर बाकी आरटीपीसीआर मध्ये रुग्ण आढळले आहेत. तुळजापुरमध्ये (२७), उमरगा (४५), कळंब (१८), परंडा (१०), लोहारा (१२), भुम (२७), वाशी (१२) येथील रुग्णांचा समावेश आहे.

Corona Update : उस्मानाबादेत दिवसभरात २०८ पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या ४ हजार ६३० वर  

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी आलेल्या अहवालानुसार २०८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये आरटीपीसीआर मधून १४० तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ६२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

तालूकानिहाय आढावा घेतल्यास उस्मानाबाद तालुक्यामध्ये ५७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील ४५ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर बाकी आरटीपीसीआर मध्ये रुग्ण आढळले आहेत. तुळजापुरमध्ये (२७), उमरगा (४५), कळंब (१८), परंडा (१०), लोहारा (१२), भुम (२७), वाशी (१२) येथील रुग्णांचा समावेश आहे.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

उस्मानाबाद शहरामध्ये विजय चौक एक, भीम नगर एक, सांजा रोड परिसर दोन, आयुर्वेदीक तीन, तांबरी विभाग एक, बार्शी दोन, जिजाऊ कॉलनी पाच, समता नगर तीन, विकास नगर एक, आनंद नगर एक, हनुमान चौक एक, ज्ञानेश्वर मंदीर परिसर पाच, महात्मा गांधी नगर दोन, एस.टी.कॉर्नर तीन तर तालुक्यामध्ये पेट्रोलपंप ढोकी पाच, कावळेवाडी पाच, येडशी दोन, अंबेजवळगा एक, कौडगाव एक, गोपाळवाडी एक, अंबेजवळगा एक, ढोकी एक, पिंपळवाडी एक, बेंबळी एक या भागामध्ये रुग्णसंख्या आढळली आहे.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

तुळजापुर तालुक्यातील अपसिंगा या गावामध्ये १३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तुळजापुर शहरात ३, सावरगाव १, करजखेडा १, तामलवाडी १, मंगरुळ ५, रामतीर्थ तांडा १ आदी गावामध्ये रुग्ण आढळले आहेत. कळंब शहरातील गांधी नगर (३), कल्पना नगर (५), तालुक्यामध्ये डिकसळ (४), शिरोढोण (२), पिंपळगाव डोळा (१), मस्सा कँप (२) या भागामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. भुम शहरामध्ये न्यु समर्थ नगर (३), लक्ष्मीनगर (१), मेन रोड परिसर (१), नागोबा गल्ली (१), रामहरी नगर (५), रक्त कॉलनी (६), संभाजी चौक (४) व कोष्टी गल्ली (१) येथील रुग्णांचा समावेश आहे. 

काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर  

  • जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या  - ४,६३० 
  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या -२,५६१ 
  • सध्या रुग्णावर उपचार सूरु   -१,९४७ 

(संपादन-प्रताप अवचार)