esakal | CORONA : उस्मानाबादेत आज २०९ रुग्णांची वाढ; आता १ हजार १८७ रुग्णांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

उस्मानाबाद तालुका १५, तुळजापुर २२, उमरगा २४, कळंब २७, भुम १८, परंडा सात, लोहारा एक अशा ११४ लोकांचा समावेश आहे. तर अँटिजेन टेस्टमध्ये उस्मानाबाद ५९, उमरगा १२, कळंब तीन, भुम सहा, तुळजापुर तीन, परंडा दहा, लोहारा दोन अशा सर्वच तालुक्यामध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. 

CORONA : उस्मानाबादेत आज २०९ रुग्णांची वाढ; आता १ हजार १८७ रुग्णांवर उपचार

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये ११४ जणाचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असून रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ९५ असे एकुण २०९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

यामध्ये उस्मानाबाद तालुका १५, तुळजापुर २२, उमरगा २४, कळंब २७, भुम १८, परंडा सात, लोहारा एक अशा ११४ लोकांचा समावेश आहे. तर अँटिजेन टेस्टमध्ये उस्मानाबाद ५९, उमरगा १२, कळंब तीन, भुम सहा, तुळजापुर तीन, परंडा दहा, लोहारा दोन अशा सर्वच तालुक्यामध्ये रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

उस्मानाबाद शहरामध्ये संत गोरोबा काका नगर तीन, जिल्हा रुग्णालय एक, स्पर्श हॉस्पीटल एक, संत ज्ञानेश्वर नगर एक तर तालुक्यामध्ये तेरमध्ये सहा, बेंबळी एक, येडशी एक आदी गावामध्ये रुग्णांची वाढ झाली आहे. तुळजापुरमध्ये पोलीस ठाणे एक, उपजिल्हा रुग्णालय दोन, तुळजापुर खुर्द एक, वेताळ गल्ली एक, एस.टी.कॉलनी दोन

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

धारीवाल टाऊन एक, टाटा कॉलेज चार,कुरेशी गल्ली एक, नळदुर्ग पोलीस ठाण्यातील सात जण, काक्रंबा येथील या भागातील तसेच गावातील लोक बाधित झाले आहेत. उमरगा येथे एस.टी.कॉलनी एक, राम नगर शिवपुरी रोड सहा, मेन रोड चार, उपजिल्हा रुग्णालय एक, दत्त कॉलनी एक, भीम नगर एक, गौतम नगर दोन याशिवाय तालुक्यातील मुरुम एक, कोरगाव तीन, माडज दोन येथेही कोरोनाचे नविन रुग्ण आढळले आहेत. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

कळंबमध्ये येरमाळा आठ, मस्सा आठ, कळंब शहरातील पाच तसेच धोकटे गल्ली एक व सराफ गल्ली एक, डिकसळ दोन, रत्नापुर एक, व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा आदी रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परंडा येथील कुराड गल्ली दोन, चिंचपुर एक, शेळगाव तीन, साकत एक आदी रुग्ण बाधित झाले आहेत.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

लोहारा तालूक्यातील कास्ती येथील एक रुग्ण सापडला आहे. भुम येथील शेंडगे गल्ली तीन यासह तालुक्यातील पाथरुड सात, चिंचोळे पाच, सावरगाव दोन व गोलेगाव येथील एक आदी रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता १९०० झाली आहे, बरे होऊन घरी गेलेले रुग्णांची संख्या ५५२ इतकी आहे. तर सध्या १ हजार १८७ रुग्णावर उपचार सूरु आहेत. तर आतापर्यंत ६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

संपादन-प्रताप अवचार