Corona Update : उस्मानाबादेत ३५ रुग्णांची वाढ; १,६०४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

corona 12.jpg
corona 12.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता. ११) सकाळी ३५ नवीन कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील केंद्रात १४८ स्वॅब पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा दोन हजार ६७९ झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. सोमवारी येथील जिल्हा रुग्णालयातून सुमारे १४८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले होते. यापैकी सर्वांचा अहवाल प्राप्त झाले आहेत. तर ३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर निगेटिव्हची संख्या १०७ झाली. मात्र सहा जणांचे अहवाल अनिर्णित आले आहेत. 

पॉझिटिव्हमध्ये पुन्हा एकदा कळंब तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ३५ पैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर तालुक्यामध्ये उस्मानाबाद सात, तुळजापूर दोन, उमरगा आठ तर भूम तालुक्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांची संख्या दोन हजार ६७९ वर पोहचली आहे. एक हजार ६०४ जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. तर ६७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान अजूनही काही स्वॅबचे अहवाल प्रलंबित असून आज सायंकाळपर्यंत ते प्राप्त होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

(संपादन- प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com