
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी रुग्णावर तात्काळ उपचार करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर केला जात आहे. मात्र दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांनाही या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी तयार केले जात आहे. मात्र काही हॉस्पिटल कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यास तयार नाहीत.
उस्मानाबाद : कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शहरातील तीन खासगी हॉस्पिटलवर फौजदारी गुन्ह्याची टांगती तलवार आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांनी शहरातील चार हॉस्पिटलला गुरुवारी (ता. १६) कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्यातील एका रुग्णालयाने उपचारास सुरुवात केली असून उर्वरीत तीन हॉस्पिटलनी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी रुग्णावर तात्काळ उपचार करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर केला जात आहे. मात्र दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांनाही या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी तयार केले जात आहे. मात्र काही हॉस्पिटल कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यास तयार नाहीत. यामध्ये शहरातील सह्याद्री हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल, वासल्य हॉस्पिटल आणि चिरायू हॉस्पिटल यांचा समावेश आहे. यातील चिरायू हॉस्पिटलने कोरोना रुग्णावर उपचार करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. मात्र उर्वरीत तीन हॉस्पिटल अशा रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
आमच्याकडे पुरेशा सुविधा नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे तीनही हॉस्पिटल प्रशासनाला वारंवार सुचना देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या मुजोर हॉस्पिटल प्रशासनावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुठे आहे माणुसकी?
डॉक्टर्स म्हणजे रुग्णांसाठी देवदूत असतात. सध्या जागतिक महामारी आली आहे. पोलिस प्रशासन, महसूल यंत्रणा, काही दानशूर व्यक्ती, असे अनेकजण स्वतः च्या परिने यामध्ये चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पैशासाठी माणुसकीचा त्याग करणारी मंडळीही याच वैद्यकीय क्षेत्रात दडली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी यातील अनेक हॉस्पिटल प्रशासनाने शासनाच्या योजना लाटल्या आहेत. यामध्ये कोट्यावधी रुपयांची खिरापत स्वतःच्या ताटात ओढून घेतली आहे. मात्र अशा महामारीच्या स्थितीत, गरीबांना योग्य सुविधा देण्याच्याऐवजी कारणे पुढे करीत पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील हे देवदूत आहेत, की यमदूत आहेत? असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
शहरातील चारही हॉस्पिटल प्रशासनाला आम्ही वारंवार सुचना देत आहोत. यापूर्वीही अनेक वेळा तोंडी तसेच लेखी सूचित केले आहे. तरीही त्यांनी कोरोना बाधीतांवर उपचारास विविध कारणे सांगत आहेत. न पटणारी कारणे हॉस्पिटलकडून सांगितली जात आहेत. जर त्वरीत उपचारास हॉस्पिटल्स उपलब्ध करून दिली नाहीत, तर फौजदारी गुन्हे दाखल करावेच लागतील.
- राजाभाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक, उस्मानाबाद.
(संपादन- प्रताप अवचार)