esakal | प्राध्यापकाला सहा लाखांचा आॅनलाईन गंडा, उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga Online Fraud News

  त्या वेळी तो कुलकर्णी यांना म्हणाला की, सर ओटीपी आने के लिए अॅटेमेटिकली फरवर्ड मेसेज ये अॅप डाउनलोड करो, असे म्हणुन त्याने डाउनलोड करायला सांगितले.

प्राध्यापकाला सहा लाखांचा आॅनलाईन गंडा, उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथील प्राध्यापकाला मोबाईल कार्ड डी-अॅक्टिवेट झाले आहे. मी पाठवलेले अॅप डाऊनलोड करून घेणे, मला ओटीपी पाठवा असे सांगून पाऊणेतीन तासांत तब्बल पाच लाख ९२ हजार ८१ रुपयांचा आॉनलाईन गंडा घातला आहे. या प्रकरणी प्राध्यापकाने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध शनिवारी (ता.१३) उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुंजोटी येथील प्राध्यापक जयदीप दगडोपंत कुलकर्णी (वय ५६) यांना ११ फेब्रुवारीला रात्री दहा वाजता मोबाईलवरून फोन आला.
सर ...आपका बीएसएनएल कार्ड डीएक्टिवेट हो गया है, मै दस मिनिट मे अॅप अँक्टिवेट कर देता हुँ, उसके लिए आपको ११ रूपये का रिचार्ज करना पडेगा. उसके लिए पहीले आप को क्विक सपोर्ट अॅप डाउनलोड करना पडेगा असे म्हणुन त्याने मला ते अॅप डाउनलोड करावयास सांगितले. डाउनलोड केल्यानंतर अकरा रूपयाचा
क्विक सपोर्ट या अॅपवर नेटवर्क बँकिंगचा पासवर्ड टाकला असता ओटीपी येत नव्हता.

त्या वेळी तो कुलकर्णी यांना म्हणाला की, सर ओटीपी आने के लिए अॅटेमेटिकली फरवर्ड मेसेज ये अॅप डाउनलोड करो, असे म्हणुन त्याने डाउनलोड करायला सांगितले. त्यामुळे अॅप डाउनलोड केला. परंतु तरीही मला ओटीपी येत नव्हता म्हणुन मी त्यास सांगितले असता तो मला म्हणाला कि, सर नेट बँकिंग से रिचार्ज नही हो रहा है, एटीएम कार्ड से करो असे म्हणाल्यामुळे मी क्विक सपोर्ट अॅपमध्ये माझा एटीएम कार्ड नंबर व सीसीव्ही नंबर टाकला. परंतु, तरीही ओटीपी येत नव्हता. त्यावेळी तो मला म्हणाला की, अभी आएँगा सर आपने प्रोफाइल पासवर्ड पहीले नहीं डाला है. वह डाल दो असे म्हणाल्यामुळे कुलकर्णी याने त्याच्यावर प्रोफाइल पासवर्ड टाकला.

त्यावेळी त्यांना म्हणाला की, अभी दस मिनिट मे आपका कार्ड एक्टिव होने का मेसेज
आयेगा असे म्हणाला. त्यावेळी त्यांना शंका येत होती की, हे काही तरी वेगळे आहे, तसे त्या व्यक्तीशी बोलणे झाले. तेंव्हा तो म्हणाला की, ,सर मैं. बीएसएनएल ऑफिस का कर्मचारी हुँ. मेरा नाम राकेश कुमार त्रिवेदी है और मैं कोथरूड, पुणे में रहता हुँ असे म्हणाला. त्यांनी त्याचा फोन रेकाॅर्ड केला आहे. त्यानंतर त्यांना खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज येऊ लागले. त्यांनी त्याला फोन केला.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा येथे क्लिक करा

पण त्याने फोन उचललला नाही. त्यावेळी कुलकर्णी घरात एकटेच होते. त्यांचे कुटूंब पुण्याला मुलाकडे गेले होते. त्यांनी घाबरून मित्रांना व नातेवाइकांना फोन केला. त्यांनी त्यांचे अकाउंटचे डिटेल्स विचारून त्यांचे एटीएम कार्ड ब्लाॅक केले. पण त्याला एक ते दीड तास लागला दरम्यानच्या काळात त्यांने कुलकर्णी यांच्या अकाउंटमधून एकुण पाच लाख ९२ हजार ८१ रुपये काढले होते. या प्रकरणी ऑनलाइन पद्धतीने झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.


संपादन - गणेश पिटेकर

loading image