esakal | उमरग्यात ४४७ शिक्षकांनी घेतली कोविड लस, कोरोनाबाधित रुग्ण वाढताहेत

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine News Umarga }

उस्मानाबाद जिल्हयात सर्वप्रथम कोरोना रुग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता. कालांतराने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली, ती दोन हजारांपेक्षा अधिक झाली.

उमरग्यात ४४७ शिक्षकांनी घेतली कोविड लस, कोरोनाबाधित रुग्ण वाढताहेत
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण करण्याचे काम १६ जानेवारीपासुन सुरू झाले होते. आतापर्यंत एक हजार ८०५ लोकांना जणांना कोव्हीन लस देण्यात आली आहे. दरम्यान सोमवारपासुन (ता.२२) शिक्षकांना लस देण्यात येत असून आतापर्यंत ४४७ शिक्षकांना लस देण्यात आली आहे.

वाचा - संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी


उस्मानाबाद जिल्हयात सर्वप्रथम कोरोना रुग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता. कालांतराने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली, ती दोन हजारांपेक्षा अधिक झाली. आता जवळपास दहा महिन्याने पुन्हा संसर्ग जोर धरतोय. १६ जानेवारीपासुन उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिन लस देण्याची मोहिम सुरू झाली. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

वाचा - रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

महसूल, पोलिस व पालिकेच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांनी लस घेतली याशिवाय नोंदणी केलेल्या लोकांनीही लस घेतली आहे. दरम्यान सोमवारपासून शिक्षकांना लस दिली जात असुन शिक्षिकाही लसीचा लाभ घेत आहेत. शिक्षक समितीचे प्रदीप मदने यांनी पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी लस घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन वैद्यकिय अधिक्षकांना दिले आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्या ३५६ लोकांना दुसरी लस देण्यात आली आहे.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सावधान ... बाधित वाढताहेत !

एकीकडे कोविड लसीची सुरूवात झालेली आहे तर दुसरीकडे शहर व ग्रामीण भागात महिनाभरापासून अधून-मधून कोरोना बाधित रुग्ण वाढताहेत. बुधवारी (ता.२४) पुन्हा रॅपिड तपासणीत दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्यानंतर लोकांमध्ये ढिलाई आली. आता कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने नाक, तोंड झापण्यासाठी अनेकांचे हात समोर येत आहेत. संसर्गाचा धोका कायम असल्याने लसीपेक्षा स्वतःची काळजी, सावधागिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.


संपादन - गणेश पिटेकर