esakal | Breaking news : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील साडे नऊ कोटींचा घोटाळा, अधिकारी, ठेकेदारासह सहा जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News
  • जिल्हाधिकारी कार्यालयातील साडेनऊ कोटींच्या घोटाळा प्रकरण
  • सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल
  • एक अधिकारी, एक खासगी व्यक्ती, चार ठेकेदारांचा समावेश
  • 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश; बडे मासे का वगळले?

Breaking news : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील साडे नऊ कोटींचा घोटाळा, अधिकारी, ठेकेदारासह सहा जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद :  जिल्हाधिकारी कार्यालयातील साडेनऊ कोटींच्या (९ कोटी ५० लाख) दलित वस्ती घोटाळा प्रकरणात सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळे चार गुहे दाखल झाले असून यामध्ये एक प्रशासकीय अधिकारी, एक खासगी व्यक्ती तर चार ठेकेदारांचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल झाले आहेत. सकाळ ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून बडे मासे मात्र यातून वगळले असल्याची चर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मोतिचंद राठोड यांच्याकडे यासंदर्भातील तपास देण्यात आला आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

जिल्ह्यातील नगरपालिकांच्या विकासासाठी आलेला निधी परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्याने ठेकेदारांना हाताशी धरून परस्पर खर्ची केला होता. यामध्ये सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे दिसून आले आहे. याबाबत सकाळने वारंवार पाठपुरावा केला होता. आता त्याला यश आले असून एका अधिकाऱ्यांसह, एक खासगी व्यक्ती तर चार ठेकेदारांवर शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

यामध्ये १) नायब तहसलीदार तथा तत्कालिन जिल्हा प्रशासन अधिकारी अभय देविदास मस्के यांचा समावेश आहे. २) मनोज औदुंबर मोरे (रा. उस्मानाबाद) ही खासगी व्यक्ती आहे. तर ३) आध्या एंटप्रायजेसचे मालक (रा. समर्थनगर, उस्मानाबाद) प्रताप राजेंद्र गायकवाड, ४) एटूझेड एंट्रप्रायझेसचे मालक (मंबई, अज्ञात मालक), ५) ए.वन एंटरप्रायझेसचे अज्ञात मालक (बालेवाडी, पुणे), ६) इ-झोन एंटरप्रायझेस चे मालक फहिम जलील शेख (रा. माळी गल्ली, उस्मानाबाद) या सहा जणांचा समावेश आहे.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

असे केले घोटाळे ------

१) खुल्या व्यायामशाळेचे दोन कोटी ४८ लाख ६९ हजार १०० हडप केले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेतून (२०१८-१९) लोहारा, उमरगा आणि कळंब या तीन नगरपालिका क्षेत्रात खुली व्यायामशाळा उभारणीसाठी दोन कोटी ४८ लाख ६९ हजार १०० रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. जी.ई.एम
पोर्टलद्वारे प्रताप राजेंद्र गायकवाड यांनी हे कंत्राट घेतले. त्यांनी
बनावट डिलीव्हरी चलन तयार केले. प्रत्यक्षात साहित्य मिळालेले नाही. चलनाच्या सत्यतेची खात्री न करताच तत्कालिन प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी अभय मस्के यांनी ठेकेदारास पैसे देऊन शासकीय निधीचा अपहार केला.

२)स्मशानभूमीत सौर दिव्यासांठीचा चार कोटीचा निधी हडप
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेत २०१८-१९ वर्षात निधी आला होता. सर्व नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत विद्युतीकरण करणे, सौर दिवे
बसविणे यासाठी चार कोटी रुपयांचे कंत्राट मुंबई येथील ए – टु झेड एंटरप्रायझेस (मुंबई) यांना देण्यात आले. या संस्थेने कामे न करताच छायांकित प्रत (फोटो कॅपी) (बनावट शिक्का असलेलेले बनावट डिलीव्हरी चलन) सादर केले. मस्के यांनी उस्मानाबाद शहरातील इक्वेटस बँकेत नियमबाह्य पद्धीतीने बचत खाते उघडले. साहित्य मिळाले नसताना कंत्राटदाराशी संगणमत
करून मनोज औंदुंबर मोरे या खासगी व्यक्तीमार्फत निधी हडप केला. यानुसार आनंदनगर पोलिस ठाण्यात मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

३) काँपॅक्टर खरेदीच्या नावाखाली ढापले एक कोटी ९९ लाख २९ हजार रुपये
नाविन्यपूर्ण योजनेतून (२०१८-१९) जिल्ह्यातील परंडा, उमरगा, नळदूर्ग, लोहारा या चार नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी काँम्पॅक्टर खऱेदी (आधुनिक पद्धतीचे कपाट) करण्याचे आदेश ए.वन एन्टरप्रायझेस (बालेवाडी, पुणे) यांना देण्यात आले. प्रत्यक्षात साहित्य मिळालेले नसताना संबंधीत ठेकेदाराला
नमूद पैसे अदा करण्यात आले आहेत. यातून संपूर्ण रक्कम हडप केल्याच्या कारणावरून एन. वन इंटरप्रायझेसच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

४) सर्व पालिकांच्या हद्दीत सौर दिवे बसविण्याच्या नावाखाली १,०३,७४,००० ढापले
नाविन्यपूर्ण योजना (२०१८-१९) या वर्षात जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीत एक कोटी तीन लाख ७४ हजार रुपयांचे कंत्राट जी.ई.एम. पोर्टलद्वारे फहिम जलील शेख (रा. माळी गल्ली, उस्मानाबाद) यांना देण्यात आले होते. संस्थेने कामे न करताच बनावट डिलीव्हरी चलन सादर केले.
तत्कालिन अधिकारी म्हस्के यांनी चलनाच्या सत्यतेची खात्री न करताच संपूर्ण रक्कम मंजूर करून ठेकेदारास दिले. यावरून फहिम जलील शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

loading image