- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

शिवसेनेचे दारे पंकजा मुंडेंसाठी खुली : माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर

जालना : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमधील नाराज असलेल्या नेत्यांना इतर पक्षांकडून ऑफर देण्यास सुरुवात झाली आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी शिवसेनेची दारे खुले आहेत, असे म्हणत शिवसेनेत येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला खूप छळ केला असा आरोप करत भाजपला एकनाथ खडसे यांनी बुधवारी रामराम केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारचा दिवस सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे याही विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांच्या प्रमाणे दूर आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तसेच त्यांच्यावर पक्षाकडून अन्याय होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. अशा वेळी शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांच्यासह शिवसेनेचे दार खुले असे म्हणत शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून पंकजा मुंडे या ऑफरला काय उत्तर देता हे पाहणे महत्त्वाचे आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)
