esakal | परतूर तालुक्यात एका रात्रीत तीन घरफोड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna News

परतूर तालुक्यातील दैठणा गावात रविवारी (ता.16) पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन ठिकाणी चोरट्यानी घरफोड्या करत लाखो रुपयाचे दागिने लंपास केले.

परतूर तालुक्यात एका रात्रीत तीन घरफोड्या

sakal_logo
By
राहुल मुजमुळे

परतूर : परतूर तालुक्यातील दैठणा गावात रविवारी (ता.16) पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन ठिकाणी चोरट्यानी घरफोड्या करत लाखो रुपयाचे दागिने लंपास केले.

परीक्षेत पास करतो, म्हणून तिला एकटीलाच बसवले वर्गात

परतूरातील घरफोडी, चोरीच्या घटना कायम असून रविवारी शहरापासून आठ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या दैठणा गावात पुन्हा तीन ठिकानी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी भारत हरिभाऊ सवणे यांच्या घराचे कुलूप तोडुन दोन तोळे सोने आणि पंचवीस हजार रुपये चोरून नेले. 

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर 

यानंतर अरुणाबाई नारायण पांडे यांच्या घरात प्रवेश करत अडीच तोळे सोने व वीस हजार चोरून नेले. तसेच गोविंद राजेभाऊ सवणे यांच्या घरातुनही एक तोळे सोने पसार केले. पहाटे पाच वाजता हा चोरीचा प्रकार नागरिकांच्या लक्ष्यात आला.

नांदेडात भरणार शंकर दरबार

या नंतर आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात येणार आहे.

loading image