पाचशे एकरावरील बांबूतून रोज पाच टन सीएनजी; पालकमंत्र्यांना पटेलांनी सांगीतले बाबूंशेतीचे गणित. 

विकास गाढवे
Monday, 16 November 2020

बांबू शेतीची लागवड केल्यास एका टनाला अडीच ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती होते. पाचशे एकरावर बांबू लागवड केल्यास रोज पाच टन गॅस निर्मिती होऊ शकते, असे बांबू शेतीचे फायदेशीर गणित माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी (ता. १४) पालकमंत्री अमित देशमुख यांना सांगितले.

लातूर : बांबू शेतीची लागवड केल्यास एका टनाला अडीच ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती होते. पाचशे एकरावर बांबू लागवड केल्यास रोज पाच टन गॅस निर्मिती होऊ शकते, असे बांबू शेतीचे फायदेशीर गणित माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी (ता. १४) पालकमंत्री अमित देशमुख यांना सांगितले. यानंतर देशमुख यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एमआयडीसीतील मोकळ्या जागेत बांबू लागवड करण्याची सूचना केली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कमी पाणी आणि कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या बलकोवा, बिमा आणि सरूच्या बाभळगाव (ता. लातूर) येथील विजयकुमार देशमुख वळसंगकर यांच्या बांबू शेतीला भेट दिल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांना बांबूशेती चांगलीच भावल्याचे दिसले. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात दिवसाला एक फूट उंचीची वाढ होऊन साठ फुटांपर्यंत उंच वाढणाऱ्या या बांबूची भारतात एकमेव बाग अमरावती येथे आहे. बांबूपासून सीएनजी गॅस व इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाचशे एकरावर केलेल्या बांबू लागवडीतून रोज पाच टन सीएनजी गॅस निर्मिती होऊ त्यावर किमान शंभर बस, पाचशे कार व दोन हजार ऑटो रिक्षा चालू शकतात. यातून शेतकऱ्याला एका टनामागे अडीच ते तीन हजार रुपयाचे उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती पटेल यांनी देशमुख यांना दिली. त्यानंतर शेतकऱ्यांना बांबूशेतीची प्रेरणा म्हणून अशा प्रकारची बांबू लागवड शहर व बाजार समितीच्या एमआयडीसीमधील मोकळ्या कंपाउंड जागेत करावी, अशी सूचना त्यांनी समितीचे ललितभाई शाह यांना केली. या वेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, दगडूसाहेब पडिले, लक्ष्मण मोरे, अविनाश देशमुख, बालाप्रसाद बिदादा, संगमेश्वर बोमने, परवेज पटेल व शेतकरी उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pasha patel told Guardian Minister deshmukh about mathematics of babusheti