esakal | परळीच्या डॉक्टरची जिद्द : दुचाकीवर बारा दिवसात कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारतभ्रमण! 
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. पिंपळे सायकल टुव्हीलर रायडर.jpg

डॉक्टरचा दृढ संकल्प पुर्ण : दुचाकीवरुन बारा दिवसात सात हजार किलोमीटरचा पल्ला गाठत केले भारतभ्रमण! परळीच्या डॉ. तुषार पिंपळे यांची अनोखी कामगिरी, कोरोनाच्या सावटात वेगळा प्रयोग करुन केली जनजागृती. 

परळीच्या डॉक्टरची जिद्द : दुचाकीवर बारा दिवसात कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारतभ्रमण! 

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी (बीड) : येथील हौशी बाईक रायडर डॉ. तुषार पिंपळे यांनी मोटर सायकलवरून केवळ १२ दिवसांत सात हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करून कन्याकुमारी ते रोहतांग पास अटल टनेल असे भारत भ्रमण करण्याचा विक्रम केला आहे. ते सोमवारी (ता.३०) येथे परतले आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

डॉ. पिंपळे १८ नोव्हेंबरला परळीतून प्रवासासाठी निघाले होते. के टू के (कन्याकुमारी ते काश्मीर) असा सात हजार किमीचा प्रवास करून ते परळीत परतले. कोरोनाच्या भीतीने एकीकडे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत, अशा काळात हौशी बाईक रायडर असलेल्या डॉ. पिंपळे यांनी भारत भ्रमण करण्याचे आव्हान स्वीकारत बाईकवरून भारत भ्रमण पूर्ण केले. डॉ. पिंपळे यांनी रोज ८०० किलोमीटर इतका प्रवास केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ते बीड, सोलापूर, बेंगलोर, कन्याकुमारी परत बेंगलोर, हैदराबाद, नागपूर, आग्रा, ग्वाल्हेर, चंदिगढ, मनाली, रोहतांग, अटल टनेल, परत चंदिगढ, जयपूर, इंदूर, धुळे, औरंगाबाद आणि शेवटी परत परळी असा सलग १२ दिवस त्यांनी प्रवास केला. त्यांच्या सोबत बीडचे डॉ. इलीयाज खान आणि दोघेजण होते. कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने त्यांचे स्वागत केले. यावेळी जयप्रकाश काबरा, प्रशांत जोशी, डॉ. गोपाल झंवर, डॉ. अशोक लोढा, डॉ. विश्वास भायेकर, मुकेश काबरा, दत्तात्रेय गुट्टे, संजय आघाव, बालासाहेब गित्ते, रवींद्र देशमुख, प्रा. विलास देशपांडे, विकास देशपांडे, वसंत फड, संतोष चौधरी, श्री. मिसाळ आदी उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image