esakal | पालावरच्या कुटुंबासोबत उमरगा पोलिसांनी साजरी केली दिवाळी!
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga.jpg

उमरगा : जिल्हा पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन यांच्या हस्ते मिठाईचे वाटप

पालावरच्या कुटुंबासोबत उमरगा पोलिसांनी साजरी केली दिवाळी!

sakal_logo
By
अविनाश काळे,

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा पोलिस ठाणे यांच्यावतीने शहर परिसरात पालावर रहाणाऱ्या  गरीब कुटुंबातील नागरिक व मुलांना रविवारी (ता.१५) सांयकाळी फराळाचे साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील श्रमजीवी महाविद्यालय भागातील पालावर वास्तव्य करणाऱ्या गरीब, निराधार कुटूंबातील महिला, पुरूष व बालका सोबत पोलिसांनी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. पालावरचं कुटुंब दिवाळीच्या सणापासुन वंचित राहू नये, त्यांच्या जीवनात एक छोटासा प्रकाश निर्माण होण्याच्या हेतूने पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळीनिमित्त सुरू असलेला लख्ख प्रकाश, फटाक्यांची आतिषबाजी पाहून दुरूनच आनंद मानणाऱ्या चिमुकल्याच्या जीवनात फराळाचे साहित्य देवून पोलिसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद होता. जिल्हा पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक श्री. अघाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसूरे, श्री. साबळे, रमाकांत शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)