तोतया पोलिस अधिकाऱ्याने सव्वा लाखाचे दागिने लुटले, लातूरची घटना

हरी तुगावकर
Wednesday, 2 December 2020

येथील नांदेड रस्त्यावर यशवंत विद्यालयाच्या परिसरात एका शेतकऱ्याला आपण पोलिस अधिकाऱ्याची बतावणी करून दोघा तोतयांनी सव्वा लाखाचे दागिने लुटल्याचा प्रकार येथे घडला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

लातूर : येथील नांदेड रस्त्यावर यशवंत विद्यालयाच्या परिसरात एका शेतकऱ्याला आपण पोलिस अधिकाऱ्याची बतावणी करून दोघा तोतयांनी सव्वा लाखाचे दागिने लुटल्याचा प्रकार येथे घडला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

येथील नांदेड रस्त्यावर यशवंत शाळेच्या परिसरात मळवटी रस्त्यावर राहणारे शेतकरी द्वारकादास भुतडा (वय ७०) यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. आम्ही पोलिस उपअधीक्षक असल्याचे त्यांनी भुतडा यांना सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हाताच्या बोटातील सात ग्रॅमची सोन्याची अंगठी, एक महाराजा लालखडा असलेली आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, एक दहा ग्रॅमचे ब्रासलेट, १५ ग्रॅमचे बदाम पान असे एकूण चार तोळे सोन्याचे दागिने, खिशातील डायरी, एक घड्याळ त्यांनी रुमालात बांधण्यास सांगितले. तो रुमाल भुतडा यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवतो असे भासवून त्यांनी हा सर्व एक लाख २० हजार रुपयांचे दागिने तोतयागिरी करून चोरून नेले. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer looted jewelery worth one and half lakh latur crime news