esakal | जालना : खाकीवर खादीचा हात ? काय आहे प्रकार वाचा सविस्तर..!
sakal

बोलून बातमी शोधा

polis.jpg


मारहाण केल्याचा आरोपानंतर पोलिस कर्मचाऱ्याची माघार घेत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

जालना : खाकीवर खादीचा हात ? काय आहे प्रकार वाचा सविस्तर..!

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : आजकाल साधी शिवीगाळ झाली तर प्रत्येक जण पोलिस ठाण्याची पायरी चढतो. मग पोलिस चौकीत जाऊन पोलिसाला मारहाण केल्यानंतर काय होईल? कुंभारी पिंपळगाव येथील पोलिस चौकीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने मला राजकीय नेत्याने मारहाण केल्याचा आरोप करत सोशल मिडियावर स्वतःहून पोस्ट केली. मात्र, या आरोपानंतर याच पोलिस कर्मचाऱ्याने मारहाणीचा प्रकारच घडला नाही, असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता.सात) घडली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली  

घनसावंगी तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव येथे पोलिस चौकी आहे. या पोलिस चौकीमध्ये सोमवारी (ता.सहा) रात्री एका जिल्हा परिषद सदस्यासह इतर तिघांनी दारूच्या नशेत मारहाण केल्याची एक पोस्ट त्यांच्या नावासह कुंभारी पिंपळगाव येथील पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी रामदास केंद्रे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली. त्यानंतर त्यांना येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे छायाचित्र ही त्यांनी स्वतःहून सोशल मिडिवर पोस्ट केले. त्यामुळे हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत जाऊन पोहचले. त्यानंतर घनसावंगीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी मंगळवारी (ता.सात) सकाळी कुंभारी पिंपळगाव पोलिस चौकी भेट दिली. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

मात्र, मंगळवारी (ता.सात) दुपारनंतर पोलिस कर्मचारी रामदास केंद्रे यांनी मारहाणीचा प्रकारच झाला नाही, मी वेगळ्या आजाराच्या कारणामुळे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालो होतो. असा घुमजाव करत प्रकरणावर पडदा टाकला. सुरुवातीला मारहाण झाल्याची सोशल मिडियावर पोस्ट टाकणारे पोलिस कर्मचारी रामदास केंद्रे यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला खरा पण त्यांच्या या पोस्टमुळे पोलिसाला मारहाण झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. दरम्यान, या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होण्याचे काम झाले आहे, हे मात्र, नक्की. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

काहीनी व्यक्तींनी पोलिस चौकीला जाऊन येण्याची शर्त लावली. त्यानंतर दोन मुलं पोलिस चौकीत आले. त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार पुढे आल्याने त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य पोलिस चौकीत आल्यानंतर त्यांची व पोलिसांची चर्चा झाली. प्राथामिक चौकशीत मारहाण झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. तरी देखील उपविभागीय पोलिस अधीकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशीअंती जे पुढे येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना.