प्रसूती कळा सुरू झाल्या, दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही, अखेर अर्चनाला नेले बैलगाडीत. 

वैजिनाथ जाधव 
Thursday, 15 October 2020

 
माहेरी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची रस्ता नसल्याने झाली फरपड.

गेवराई (बीड) : प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या म्हणून माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी खडतर रस्त्याचा सामना करावा लागला. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पुर्ण झाली तरी गेवराई तालूक्यातील जळगाव मजरा गावाला अद्याप पक्क्या रस्त्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

चिखल तुडवीत व गाडी बैलाने प्रवास करावा लागला. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष उलटले तरी  अद्यापही या गावाला चांगला रस्ता नाही. या घटनेनंतर गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेवराई तालुक्यातील जळगाव (मजरा) ते रुई येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तर गावातील रस्त्यांची वाट लागली आहे. नागरिकांना ये-जा करताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. चिखल तुडवीत चालावे लागत आहे. यामुळे गावातील आजारी रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास कसरत करावी लागत आहे. या गावाला आता पर्यत कधीच पक्का रस्ता मिळाला नसल्याने गावकऱ्यांचे रस्त्यासाठी हाल होत आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान अर्चना गुंदेकर या बाळंतपणासाठी माहेरी जळगाव येथे आल्या. गुरूवारी सकाळी प्रसुती कळा सुरु झाल्याने दवाखान्यात नेण्यासाठी धावधाव सुरु झाली. मात्र, गावाचा रस्ता एवढा अवघड झाला असून कोणतेही वाहन येते येण्यास तयार नाही. अखेर प्रसुतीच्या वेदना सुरु असताना काही ठिकाणी पायी चालावे लागले. तर अखेर बैलगाडीने हॉस्पिटन गाठावे लागले. या प्रकाराने गावातील लोकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. आणखी किती दिवस अशा रस्त्यांचा सामना करावा लागेल. देव जाणे. आता तरी प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnancy trouble due to lack of bad roads Beed DIstrict news