औरंगाबादच्या निराला बाजारात हुक्का पार्लरचा पर्दाफाश : पंधरा जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

पोलिसांच्या छाप्यात चौदा ग्राहकांसोबतच एक अल्पवयीन मुलगाही तेथे पोलिसांना आढळला. सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखा पथकाने क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले.

औरंगाबाद : निराला बाजार येथील एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील फ्लो कॅफे ऍण्ड लॉजमधील अवैध हुक्का पार्लरचा गुन्हेशाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात कॅफेचालकासह पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (ता.19) रात्री करण्यात आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फराज अहमद सिद्दिकी (वय 21, रा. कटकटगेट) असे व्यवस्थापकाचे नाव आहे. निराला बाजार येथील आर्टस ऍण्ड एक्‍झिक्‍युटिव्ह हॉटेलच्या चौथ्या मजल्यारील फ्लो कॅफे ऍण्ड लॉजमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना समजली. त्यानंतर रात्रीतून पोलिसांनी या हुक्का पार्लरमध्ये छापा घातला. त्यावेळी फराज सिद्दिकी तंबाखूमिश्रित हुक्का पार्लर चालविताना पोलिसांना आढळून आला.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी

पोलिसांनी हुक्का पार्लरच्या परवानाबाबत फराजला विचारणा केली, तेव्हा हॉटेलचा परवानाधारक शेख समीर शेख सलीम (रा. लेबर कॉलनी) याच्या सांगण्यावरून हुक्का पार्लर चालविला जात असल्याची बाब त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तंबाखूमिश्रित वेगवेगळे फ्लेवर हुक्का ओढण्यासाठी पार्लरमध्ये पुरविले जात होते. ग्राहक रात्री येथे येत होते व हुक्का ओढत होते.

अल्पवयीन मुलगाही आढळला

पोलिसांच्या छाप्यात चौदा ग्राहकांसोबतच एक अल्पवयीन मुलगाही तेथे पोलिसांना आढळला. सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखा पथकाने क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. हुक्का पार्लरमधून सतरा हजार पन्नास रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी संशयित सोळा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

ही कारवाई सहायक आयुक्त नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय जाधव, शिवाजी झिने, नजीर पठाण, राजेंद्र साळुंके, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, संजय जाधव, संदीप क्षीरसागर, नितीन धुळे, शेख सुलताना, प्राजक्ता वाघमारे यांनी केली.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on Hukka Parlour at Nirala Bazar in Aurangabad