
राज्य शासनाकडून आता पावसाचे मोजमाप सार्वजनिक न करण्याचा फतवा प्रत्येक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात किती अन् कुठे अतिवृष्टीमुळे पिकांने नुकसान झाले हे आता राज्य शसनाकडून लपविण्यात येणार आहे.
जालना : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून पावसाळ्यामध्ये पडलेल्या पावसाचे मोजमाप केले जाते. चोवीस तासांच्या काळात झालेल्या पावसाची अकडेवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मिलिमीटरमध्ये जाहीर केली जाते. त्यामुळे कुठे किती पाऊस झाला ? कुठे अतिवृष्टी झाली? याची सर्वसामान्यांना माहिती मिळते. मात्र, राज्य शासनाकडून आता पावसाचे मोजमाप सार्वजनिक न करण्याचा फतवा प्रत्येक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात किती अन् कुठे अतिवृष्टीमुळे पिकांने नुकसान झाले हे आता राज्य शसनाकडून लपविण्यात येणार आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पावसाळ्यात ता. एक जूनपासून पाडणाऱ्या पावसाचे मोजमाप केले जाते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण किती आहे. हे लक्षात येते. कोणत्या जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली तर कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांसह ओल्या दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे, या बाबी राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्ह्यात पडलेल्या पावसाचे मोजमाप करून जाहीर केलेल्या आकडेवरीवरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळते.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
मात्र, आता शासनाने अजब फतवा काढला आहे. राज्य शासनाच्या या फतव्यानुसार यापुढे पडणाऱ्या पावसाच्या मोजमापाची आकडेवारी जाहीर करू नये, असे आदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. त्यानुसार मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पावसाची अकडेवारी जाहीर करणे बंद केले आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला, याची माहिती आता सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचू देणार नाही.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
राज्यातील केवळ अपात्ती व्यवस्थापनाला त्यांच्या जिल्ह्यात किती पाऊस झाला, याची माहिती वेबसाईटवर पाहता येणार आहे. त्यासाठी ही शासनाने प्रत्यक जिल्ह्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड दिला आहे. त्यामुळे राज्य शासन पावसाची अकडेवारी लपवून नेमक काय साध्य करणार आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
Edited By Pratap Awachar