अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खटला जलदगतीने चालविणार : पोलिस अधीक्षक रौशन    

Rajtilak Raushan.jpg
Rajtilak Raushan.jpg

उस्मानाबाद : लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा वर्षीय बालिकेवर सामुहिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली असुन या निंदनीय घटनेमुळे पोलीस दल त्या पिडीत बालिकेस व कुटुंबीयास सहानुभूतीपुर्वक सर्वोतेपरी मदत करीत आहे, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करुन हा खटला जलदगती कोर्टात चालविला जाईल, असे उस्मानाबाद पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यानी सांगितले. अल्पवयीन अत्याचार प्रकरणी त्यांनी शुक्रवारी ता.23 पत्रकारांशी संवाद साधला. 


यावेळी श्री. रौशन म्हणाले की, अत्याचाराची घटना रविवारी (ता.18) घडली होती. सोमवारी तिला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिडीत बालिका बेशुध्दअवस्थेत असल्याने तिचा जीव वाचविण्यासाठी पोलीसांनी पहिले प्राधान्य दिले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. सध्या ही बालिका शुध्दीवर आल्याने तिच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना असून यातील तीनही संशयीत अल्पवयीन असुन त्यांना 29 तारखेपर्यंत रिमांडमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती श्री. रौशन यानी दिली. 

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्याकडे देण्यात आला. लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करुन हा खटला जलदगती कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही श्री. रौशन यानी व्यक्त केला. मी व्यक्तीगत या प्रकरणामध्ये जातीने लक्ष देत असून अशा प्रवृत्ती करणार्यांना योग्य ती शिक्षा मिळण्यासाठी आम्ही पुर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार पोलीस अधिक्षक श्री. रौशन यानी व्यक्त केला. त्यासाठी दोषारोपपत्र अत्यंत काळजीने करण्यात येत असुन त्यातुन एकही बाब सुटणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत आहेत. या घटनेनंतर तिच्या कुटुंबाला सावरण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव देखील तयार करण्यात येत आहे. तो देखील काही दिवसात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार आहे. 

उपचार करणार्या डॉक्टरांशी संपर्कात 

पिडीत बालिकेच्या कुटुंबियाना अडचण येऊ नये यासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्यासोबत ठेवण्यात आले आहेत. बालिकेवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी स्वतः असून योग्य उपचार मिळतील याची खबरदारी मी घेत असल्याचेही श्री. रौशन यानी सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com