उदगीर : सरपंचपदाची आरक्षण सोडत; ८७ पैकी ४८ ग्रामपंचायती एससी, एसटी, ओबीसीसाठी राखीव

udgeer grampanchyat.jpg
udgeer grampanchyat.jpg

उदगीर (लातूर) : तालुक्यातील सत्यांऐंशी पैकी अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव काढण्यात आले असून एकूण पन्नास टक्के म्हणजे चव्वेचाळीस सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
गुरुवारी (ता.१९) येथील राधे कृष्ण मंगल कार्यालयात आयोजित आरक्षण सोडत कार्यक्रमात एकूण सत्त्याऐंशी पैकी चोवीस ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, बावीस ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी तर दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव काढण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांच्यासह अनेक गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीसाठी टाकळी तर अनुसूचित जमाती महिलेसाठी बोरगाव (बु) येथील सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी लोहारा, भाकसखेडा, होनीहिप्परगा, चिमाचीवाडी, हेर, वायगाव, लोणी, कुमदाळ (उदगीर), डांगेवाडी, हकनकवाडी, डोंगरशेळकी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित गावे : पिंपरी, बनशेळकी, एकुरका रोड, अवलकोंडा, चिघळी, सुमठाणा, मांजरी, तोंडार, आडोळवाडी, गुडसूर गावांचा समावेश आहे. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी : उमरगा मन्ना, शेकापूर, नळगीर, येंणकी, तोगरी, खेर्डा, करवंदी, माळेवाडी, वागदरी, गंगापूर, कौळखेड, क्षेत्रफळ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण जागेसाठी लिमगाव, हंगरगा, हाळी, नागलगाव, शंभू उमरगा, धडकनाळ, डाऊळ, वाढवणा, कासराळ, नावंदी, गुरदाळ, देऊळवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.

सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेली गावे - नेत्रगाव, सताळा (बु), तोंडचिर, इस्मालपुर, धोंडीहिप्परगा, रावणगाव, रुद्रवाडी, अरसनाळ, सुकणी, जकनाळ, जानापुर, डिग्रस, सोमनाथपूर, हैबतपुर, वाढवणा, (खू) बेलसकरगा, मोघा, हंडरगुळी करडखेल.
खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेली गावे- चांदेगाव, किनी यल्लादेवी, कल्लुर, हिप्परगा, निडेबन, मलकापूर, कुमदाळ (हेर), बामणी, शेल्हाळ, करखेली, तादलापुर, देवर्जन, चोंडी, दावणगाव, मोर्तळवाडी, टिवटग्याळ, शिरोळ मल्लापुर, कुमठा.

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...
ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या ६१ गावाच्या निवडणूकीत तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत आहेत. यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे (कुमठा), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील (हाळी), भाजपाचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले (नळगीर), माजी पंचायत समिती सभापती सत्यकला गंभीरे (करवंदी), पंचायत समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा शिवाजी मुळे (दावणगाव), माजी उपसभापती रामदास बेंबडे (इस्मालपुर), पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com