लातूरच्या ‘रुमा’ची हस्तकारी गोधडी आता ऑनलाइन 

हरी तुगावकर
Tuesday, 24 November 2020

अनसरवाडा (ता. निलंगा) येथील रुमा बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक हस्तकारी गोधडीने ऑनलाइन झेप घेतली आहे. ही गोधडी आता एका आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील महिला काय करू शकतात हे आता या बचतगटाने दाखवून दिले आहे. ऑनलाइन शॉपिंगवर जाणारी गोधडी हे जिल्ह्यातील बचतगटाचे पहिले उत्पादन ठरले आहे. 

लातूर : अनसरवाडा (ता. निलंगा) येथील रुमा बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक हस्तकारी गोधडीने ऑनलाइन झेप घेतली आहे. ही गोधडी आता एका आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील महिला काय करू शकतात हे आता या बचतगटाने दाखवून दिले आहे. ऑनलाइन शॉपिंगवर जाणारी गोधडी हे जिल्ह्यातील बचतगटाचे पहिले उत्पादन ठरले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

ग्रामीण भागातील महिलांचे बचतगटांच्या माध्यमातून संघटन करून त्यांना संघटनात्मक, नेतृत्व, आर्थिक साक्षरता व व्यावसायिक कौशल्य अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून त्यांना व्यवसायिकतेची जोड देण्याचा उपक्रम ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’तून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत स्थापित बचतगटांच्या महिलांनी छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. त्या व्यवसायातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. सध्याच्या सोशल नेटवर्किंगच्या काळातही या बचतगटांच्या महिलांचे उद्योग भरारी घेताना दिसत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील ‘उमेद’च्या रुमा बचतगटाने सुरू केलेले पारंपरिक गोधडी हे उत्पादन आता एका नामांकित ऑनलाइन शॉपवर उपलब्ध झाले आहे. प्राचीन काळातील लोप पावत चाललेली आणि ग्रामीण भागात उदयास आलेली हस्तकारी गोधडी या उत्पादनास यामुळे पुनरुज्जीवन मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या अभिनव संकल्पनेमुळे तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज छोट्या खेड्यातील बचतगटांच्या महिलेच्या या पारंपरिक उत्पादनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी यांच्या नियोजनबद्ध पाठपुराव्यामुळे तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे व जिल्हा व्यवस्थापक विपणन वैभव गुरले यांनी महिलांना दिलेल्या प्रेरणेमुळे हे साध्य करणे शक्य झाले. या कामी उमेद तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनीही पुढाकार घेतला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या तीन चार महिन्यांपासून याची प्रक्रिया करण्यात येत होती. या पुढील काळातही जिल्ह्यातील उमेद बचतगटांची सोया नटस, सोया कॉफी, बेबी बेडिंग व खास ग्रामीण भागातील चटण्या व मसाले इत्यादी उत्पादने ऑनलाइन शॉपवर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. 
- संतोष जोशी, संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ruma women self-help group Handicraft doll now online Latur news