
कु. रेणुका दिलीप गुंडरे या दहावीत ९३.२० टक्के गुण मिळविणार्या मुलीचे वडिल अगोदरच तर आई निकालाच्या आदल्या दिवशीच सर्पदंशाने मृत्यु झाला. डोळ्यासमोर काळोख असताना अशा संकटात तिला शुक्रवारी (ता.३१) सकाळी अकरापर्यंत तीन लाख ६० हजार रुपयांची मदत तिच्या बँक खात्यावर तर रोख ४० हजार रुपये जमा झाले.
जळकोट (लातूर) : आई ...मी पास झाले ग....माझा निकाल तर ऎक..अशी काळीज चिरणारी आर्त हाक मारणारी कु. रेणुका दिलीप गुंडरे या दहावीत ९३.२० टक्के गुण मिळविणार्या मुलीचे वडिल अगोदरच तर आई निकालाच्या आदल्या दिवशीच सर्पदंशाने मृत्यु झाला. डोळ्यासमोर काळोख असताना अशा संकटात तिला शुक्रवारी (ता.३१) सकाळी अकरापर्यंत तीन लाख ६० हजार रुपयांची मदत तिच्या बँक खात्यावर तर रोख ४० हजार रुपये जमा झाले. आणखी मदतीचे हात पुढे येत असल्याने यानिमित्ताने माणूसकीचे दर्शन घडत आहे.
लातूर जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना : आई मी पास झाले ग...पण निकाल सांगू तरी कोणाला..
गुरूवारी (ता.३०) दै. सकाळच्या अंकात व बुधवारी इ-सकाळमध्ये आई...मी पास झाले...! आता निकाल कोणाला सांगू? या शिर्षकाखाली बातमी प्रकाशित झाल्यानंतर मदतीचा ओघ वाढत आहे. शेकडो हात पुढे येत आहेत. शंभर रुपयापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंत अनेकांनी तिच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यावर शुक्रवारी सकाळी अकरापर्यंत तीन लाख ६० हजार रुपये मदत जमा झाली आहे. तर रोख स्वरुपात ४० हजार रुपये जमा झाल्याचे सरपंच माधव भुरे, लक्ष्मण तगडमपल्ले,संतोष डोणगावे,पांडुरंग वाघमारे यांनी दै. सकाळशी बोलताना सांगितले. त्यामुळे अजूनही माणूसकी शिल्लक आहे. याचे जीवंत उदाहरण समोर आले आहे. अनेकांनी या चिमुकल्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन करत मदत केली. त्यांना कुठे शिक्षणाची सोय करता येईल याची ग्रामस्थाबरोबर चर्चा केली.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
मदत करणारेही भावनिकपणे विविध ग्रुपवर मी माझ्या परीने फुल ना फुलाची पाकळी मदत करत आहे. रेणुकाताई तू घाबरु नको...आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, बहिणीला तुम्ही करत असलेली मदत ही अमूल्य आहे असे विविध संदेश देत अनेक भावांनी आधार देण्याचाही प्रयत्न केला आहे.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
रेणुकाचे वडीलांचे आठ वर्षापूर्वी निधन झाले आहे. पित्याचे छत्र हरपल्यानंतर तीन बहिणी ज्यात एक शिवानी सहावीला, अश्विनी आठवीला तर रेणूका दहावीला व त्यांची आई. असे त्यांचे कुटुंब. आईच मजुरी करुन मुलींना शिकवायची. मुलीही एकापेक्षा एक हुशार. परंतु नियतीला हे पाहवले नाही. दहावीच्या निकालाच्या पहिल्या दिवशी आईला सर्पदंश होऊन तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दु:खाचा डोंगर कोसळला. तिघी बहिणी एकमेकींच्या गळ्याला पडून रडू लागल्या. जे पाहण्यासाठी गेले त्यांचे काळीज फाटले. तेही हुंदके देताना दिसू लागले. अशा स्थितीत ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींनी, महिलांनी पुढे येऊन चिमुकल्यांचे डोळे पुसले. गावातील प्रत्येक माणसाला लेकरांची काळजी लागली असल्याचे चित्र होते.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
गुरूवारी दुपारी सकाळ बातमीदाराने येथे भेट देऊन सांत्वन केले. चिमुकले जेवायला तयार नव्हते. मामा मामीं, शेजारी, महिला त्यांची समजूत घालत होते. त्यांचे दु:ख कसे झेलणार, त्यांना आधार कसा द्यावा, समजूत कशी घालावी? असा प्रश्न सर्वानाच पडला होता. दहावीत ९३ टक्के मार्क घेणार्या रेणुकाचे कौतुक कसे करावे? आनंद व दु:ख एकत्रित आल्याने अनेकजण नि:शब्द झालेले दिसत होते.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
राज्यमंत्री बनसोडे यांनी स्विकारले पुढाकार
दै.सकाळमधील बातमी वाचताच सर्व ग्रुपवर सुसंवाद सुरु झाले. मदतीचे हात पुढे येऊ लागले. राज्यमंत्री संजय बनसोडे स्वतः कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये असूनही आपल्या कार्यकर्त्यामार्फत २१ हजार रुपयांची व अन्नधान्य मदत पोहोंच केली. पुढील पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पूर्ण खर्च करण्याचे व पालकत्व स्विकारण्याबाबत सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी,युवक, शिक्षक,अधिकारी,कर्मचारी आदिंची मदत सुरु झाली. यावरून आजच्या काळात माणूसकी हरवली असे म्हणतात पण ती अजूनही जीवंत आहे याचे हे ज्वलंत उदाहरण पाहावयास मिळते.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
ताई...तू आम्हाला सोडून नको ग जाऊ...!
सकाळपासून अनेकजण भेटून सांत्वन करत आधार देत होते. काहींनी रेणुका हूशार असल्याने तिला पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी कुठे ठेवावे? याची चर्चा करत असताना सर्वजण बाहेर जाताच तिच्या दोन चिमुकल्या बहिणी रडत रडत रेणुकाच्या गळ्याला पडून ताई...तू आम्हाला सोडून जाऊ नकोस ग असे म्हणताना पाहून काळीज फाटत असल्याचा अनुभव आला. मी तुम्हाला सोडून जाणार नाही तुम्हाला सोबत घेऊनच शिक्षण घेईन..! असे रेणूका त्यांना कवटाळून म्हणताना पाहिले की, ह्रदयात कालवाकालव होत होती.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
दै.सकाळने ह्रदयाला स्पर्श करणारी बातमी प्रकाशित केल्यानंतर गुगल पे, फोन पे च्या माध्यमातून अनेकांनी मदतीचा हात दिला. आणखी मदतीचा ओघ सुरूच आहे. सरपंच माधव भुरे व ग्रामस्थांनी दै. सकाळचे आभार मानले आहेत.
(संपादन-प्रताप अवचार)