esakal | धक्कादायक : गेवराई तालुक्यात मावस बहीण-भावाचा मृतदेह आढळला विहिरीत
sakal

बोलून बातमी शोधा

21.jpg

भाट आंतरवली येथील एका विहीरीमध्ये मंगळवार (ता.एक) सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. मागील दोन दिवसांपासून हे दोघे बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. तर या दोघांमध्ये मावस बहीण भावाचे नाते आहे.

धक्कादायक : गेवराई तालुक्यात मावस बहीण-भावाचा मृतदेह आढळला विहिरीत

sakal_logo
By
वैजिनाथ जाधव

गेवराई (बीड) : गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील माटेगाव शिवाराच्या भाट आंतरवली येथील एका विहीरीमध्ये मंगळवार (ता.एक) सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. मागील दोन दिवसांपासून हे दोघे बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. तर या दोघांमध्ये मावस बहीण भावाचे नाते आहे.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

मयत शुभम कापसे (वय १७) रा.भाट आंतरवली व कावेरी खंदारे (वय १६) रा. पाथरवाला खुर्द (ता. गेवराई) ही दोघे सद्या माटेगाव येथे नातेवाईकांकडे राहत होते. कावेरीला विवाहासाठी पाहुणे पाहण्यास येणार होते. तेव्हा पासून ती अस्वस्थ होती. दरम्यान शनिवार (ता.२९) ऑगस्ट रोजी पासून ते दोघेही घरातून बेपत्ता होते. त्यांचा शोधही घेतला होता. परंतु सदरील मृतदेह मंगळवार रोजी विहिरीत तरंगताना दिसून आले. विहीर मालक सुधाकर चव्हाण यांनी या बाबत चकलांबा पोलिस ठाण्यात माहिती दिली. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

माहिती कळताच चकलांबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व पोलीस कॉन्सटेबल अमोल औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थाच्या साह्याने मृतदेह विहीरीबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाचे उमापूर आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदन करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहेत. दोघांचे मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने परीसरात उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे, सदर घटनेची चकलांबा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

(संपादन-प्रताप अवचार)