esakal | बीड : पोलीस स्टेशन समोरील पाच दुकाने फोडली; चोरट्यांनी हजारोची रक्कम केली लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

beed.jpg


पोलीस दुरक्षेत्र कार्यालयाच्या समोरील व हाकेच्या अंतरावरील दुकानात चोरीच्या घटना घडल्याने नागरीकातून पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

बीड : पोलीस स्टेशन समोरील पाच दुकाने फोडली; चोरट्यांनी हजारोची रक्कम केली लंपास 

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (बीड) : तालुक्यातील आडस येथील शिवाजी महाराज चौक परिसरातील पाच दुकानांचे शटर वाकवून अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना शुक्रवारी (ता.२४) रोजीच्या मध्यरात्री दोन-तीनच्या दरम्यानच्या सुमारास घडली आहे. पहाटेच्या सुमारास शेतात जाण्यासाठी निघालेल्या शेतकर्यांना किराणा दुकानदाराच्या चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर धावपळ व शोधाशोध केल्यानंतर सोबत घेऊन बघितले असता पाच दुकानांची चोरी झाल्याचे दिसून आले. चोरीच्या घटनेची माहिती पोलीसांना कळविण्यात आल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

तालूक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौका दरम्यान अंबाजोगाई रस्त्यालगत असणाऱ्या वरद मेडीकल, माने किराणा, ओमसाई कृषी सेवा केंद्र, विशाल हार्डवेअर व श्रीकृष्ण ज्वेलर्स या पाच दुकानांचे शटर वाकवून चोरीच्या घटना शुक्रवारी मध्यरात्री दोन-तीन वाजण्याच्या दरम्यान घडल्या आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

नित्याप्रमाणे पहाटे उठून शेतात जाण्यासाठी निघालेल्या सत्यनारायण माने यांना आपल्या दुकानाचे शटर अर्धे उघडे असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता शटर वाकलेले असल्याचे पाहून चोरीचा प्रकार समोर आला. त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घडलेला चोरीचा प्रकार सांगितला. शेजारी जमा झाल्यानंतर त्यांनी महाराणा प्रताप चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावरून पाहिले असता पाच दुकानांचे शटर वाकवून चोरी झाल्याचे दिसून आले.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

या चोरीच्या घटनेची माहिती पोलीसांना कळविताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव व पोलीस शिपाई हनुमंत कातखडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्ळांची पहाणी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता दुचाकीवरून आलेल्या तीन जण अज्ञात चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

यावेळी चोरांने पाचपैकी चार दुकानात शटर वाकवून दुकानातील काऊंटर मधील रोख रक्कमेची चोरी केली आहे. मात्र ओमसाई कृषी सेवा केंद्राच्या शटरच्या आत दोन चायनल गेट असल्याने येथील चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. चोरी झालेल्या चार दुकानातील तीस-पस्तीस हजाराची रोख रक्कम चोरीला गेली आहे. चोरीच्या घटनेच्या तपासासाठी चोरांच्या हाताचे ठसे शोधण्यासाठी बीड वरून पथक पाचारण करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांनी दिलेल्या माहितीवरून धारूर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

(संपादन-प्रताप अवचार)