Jalna Crime | जालन्यात बंदुकीचे धाक दाखवून साडेसहा लाख पळवले

बँकेत भरण्यास दुचाकीने जात असलेल्या कर्मचाऱ्यास चारचाकीमधून आलेल्या दोघांनी अडवले.
Jalna Crime News
Jalna Crime Newsesakal

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : पेट्रोलपंपाची रक्कम बँकेत भरण्यास दुचाकीने जात असलेल्या कर्मचाऱ्यास चारचाकीमधून आलेल्या दोघांनी अडवले. नंतर बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील सहा लाख ५० हजार रुपये घेऊन पळ काढला. ही घटना बुधवारी (ता.११) दुपारी साडेबाराच्या सुमारास कुंभार पिंपळगाव-आष्टी रस्त्यावरील मूर्ती फाट्याजवळ घडली.
मूर्ती (ता. घनसावंगी) येथील हरिभाऊ सोळंके यांचा आष्टी-कुंभार पिंपळगाव रस्त्यावर मूर्ती फाट्याजवळ श्रीकृपा पेट्रोलपंप आहे. या पंपावर नयुम सय्यद हे कर्मचारी म्हणून काम करतात. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते पेट्रोलपंपाची रक्कम घेऊन दुचाकीवरून बँकेकडे जात होते. (Six Lakh Looted In Ghansawangi Taluka Of Jalna)

Jalna Crime News
PHOTOS | औरंगाबादमध्ये ३०० पेक्षा जास्त घरांवर बुलडोझर, कुटुंबांचा आक्रोश

यावेळी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमधून आलेल्या अनोळखी दोघांनी त्यांना अडवले. त्यांनी अर्धवट मास्क लावलेला होता. त्यापैकी एकाने चारचाकीतून उतरून नयुम यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैशाची पिशवी हिसकावून धूम ठोकली. या पिशवीत साडेसहा लाख रुपये होते. दरम्यान, प्रसंगावधान राखत नयुम यांनी दुचाकीवरून चोरांच्या चारचाकीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. (Jalna)

Jalna Crime News
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत असताना वीजपुरवठा खंडित...

मात्र, ते हाती लागले नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक संतोष मरळ यांनी घटनास्थळाला भेट देत परिसराची पाहणी केली. सायंकाळी अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com