काळभैरवनाथांच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविक; गुलालाची उधळण करीत चांगभलाचा जयघोष

प्रकाश काशीद
Tuesday, 17 November 2020

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखों भाविकांचे कुलदैवत, श्रध्दास्थान असलेल्या काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी येतात. मात्र कोरोना संसर्गामुळे मंदीर बंद होते. भैरवनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अटी व नियमानुसार काळभैरवनाथ मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यामध्ये भाविकांना दर्शना व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक विधी, होमहवन पुजा, अभिषेक भक्तांना करता येणार नाहीत.

परंडा (उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यापासून बंद असलेले श्री.क्षेत्र सोनारी येथील लाखों भाविकांचे कुलदैवत, श्रध्दास्थान असलेल्या श्री. काळभैरवनाथ व जोगेश्वरीचे मंदिर शासन आदेशानुसार सोमवारी (ता.१६) दिवाळी पाडवा व भाऊबीज या मंगलप्रसंगी उघडण्यात आले. पहाटे दोन वाजता मंदीराची दारे खुली करण्यात आली. पहाटे पाच वाजता महाआरती करण्यात आली. मंदीर परिसरात सोनारी ग्रामस्थ, पुजारी, भाविकांनी गुलालाची मुक्त उधळण करीत भैरवनाथांच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला.

अंबाजोगाईत जोगेश्वरी मंदिर फुलांनी सजले 

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखों भाविकांचे कुलदैवत, श्रध्दास्थान असलेल्या काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी येतात. मात्र कोरोना संसर्गामुळे मंदीर बंद होते. भैरवनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अटी व नियमानुसार काळभैरवनाथ मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यामध्ये भाविकांना दर्शना व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक विधी, होमहवन पुजा, अभिषेक भक्तांना करता येणार नाहीत. भैरवनाथ देवस्थान व मंदीराचे मुख्य पुजारी संजय महाराज, समीर पुजारी यांनी शासकीय नियमाप्रमाणे संपुर्ण मंदीर परिसराची स्वच्छता केली आहे. मंदीर परिसरात सॕनिटायझरचा वापर करण्यात येत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.   
मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी भाविकांनी तोंडावर मास्क लावून प्रवेश करने बंधनकारक आहे. आज मंदीरात दर्शनासाठी आलेल्या भाविकभक्तांना  प्रथम प्रवेश दिला गेला. सोमवारी मंदिरामध्ये  सकाळी दर्शनापूर्वी, दर्शन मार्ग व दर्शनाची रांग सॅनिटायझर करण्यात आली. ठिकठिकाणी बॕरिकेटस् लावण्यात आले आहेत. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत दर्शन झाल्यानंतर पुन्हा दर्शन मार्ग व दर्शनाची जागा सॅनटाईझर करण्यात येत आहे. काळभैरवनाथांच्या मुख्य गाबाऱ्यात भाविक गर्दी करु लागल्याने थेट गाबाऱ्यात  भाविकांना  प्रवेश न देता मंदिरात मुखदर्शनाचा लाभ भाविकांना देण्यात येत असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी संजय महाराज यांनी सांगितले. भाविकांनी दर्शन करते वेळी दर्शन रांगेत अंतर ठेवावे. मंदिराबाहेर कोरोना पार्श्वभुमीवर सूचना फलक लावण्यात आले असून त्याप्रमाणे भाविकांनी सूचनांचे पालन करून देवस्थान समिती व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ही मंदिर समितीने दिले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आनंदाचे  वातावरण 
भैरवनाथांच्या नावाने, चांगभलं गजराने मंदीर परिसर दुमदुमत आहे. गेल्या आठ महिन्यापासून चांगभलंचा गजर लुप्त झाला होता. आता भाविक भक्तांना काळभैरवनाथांचे दर्शन मिळू लागले आहे. त्यामुळे ते आनंदाचे, उत्साहाचे वातावरण भरलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडवा  शुभदिनी आज सोमवारी आठ वाजता मंदीरात दिपप्रज्वलन करीत दिपोउत्सव साजरा करण्यात आला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

श्री क्षेत्र सोनारी येथे श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवांची चैत्र रथोत्सवास दरवर्षी लाखों भावीक हजेरी लावतात. यात्रेतील रथ ओढण्यासाठी परगावाहून भाविक मोठी गर्दी करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यात्रा रद्द करण्यात आली. आठ महिने सोनारी मंदीर परिसर भाविकाविना सुनासुनाच होता. येथे असलेल्या हजारों देवाच्या माकडांना भाविक मनोभावे खाद्य देतात. कोरोनामुळे भाविकच नसल्याने माकडांना रानोमाळ भटकंती करावी लागली. आता मंदीर सुरु झाल्याने पुर्वपदावर येत भाविकांचा ओघ वाढत जाणार आहे.

Edited by Pratap awachar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonari Kalbhairavnath temple open and thousands of devotees take darshan