SSC RESULT : लातूर विभाग राज्यात सातव्या स्थानी, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.०९ टक्के निकाल 

विकास गाढवे
Wednesday, 29 July 2020

राज्यात लातूर मंडळाचा क्रमांक सातवा आहे. निकालात दरवर्षीप्रमाणे लातूर जिल्ह्याची आघाडी कायम असून जिल्ह्याचा निकाल ९६.५१ टक्के लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा ९४.२५ टक्के तर नांदेड जिल्ह्याचा ८९.५३ टक्के निकाल लागला आहे.

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी व मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. २९) जाहीर झाला असून यात लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९३.०९ टक्के लागला आहे. यात राज्यात मंडळाचा क्रमांक सातवा आहे. निकालात दरवर्षीप्रमाणे लातूर जिल्ह्याची आघाडी कायम असून जिल्ह्याचा निकाल ९६.५१ टक्के लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा ९४.२५ टक्के तर नांदेड जिल्ह्याचा ८९.५३ टक्के निकाल लागला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

विभागातील लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यातून एक लाख नऊ हजार नऊ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख सात हजार ७७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ३५ हजार ७९७ विद्यार्थी विशेष्य प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून त्यात लातूरच्या १६ हजार ९९०, नांदेडच्या १० हजार ८३८ तर उस्मानाबादच्या सात हजार ९६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीत ३३ हजार साठ, द्वितीय श्रेणीत २३ हजार ९४४ तर पास श्रेणीत सात हजार ५३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकीरडे यांनी सांगितले. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

पुनःपरिक्षार्थी (रिपीटर) विद्यार्थ्यांचा निकाल ६२.५७ टक्के लागला असून यात नऊ हजार ८७ पैकी पाच हजार ६८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात दहा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ४२ विद्यार्थी प्रथम, ७६ विद्यार्थी द्वितीय तर पाच हजार ५५८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

निकालात मुलींचीच आघाडी असून विभागात उत्तीर्ण मुलींचा टक्का ९५.४६ तर मुलांची टक्केवारी ९१.०८ आहे. यात लातूर जिल्ह्यात ९७.७६ मुली तर ९५.५३ मुले, उस्मानाबाद जिल्ह्यात ९६.६४ टक्के मुली तर ९२.१० टक्के मुली तसेच नांदेड जिल्ह्यात ९२.९९ टक्के मुली तर ८६.४८ टक्के मुले उत्तीर्ण झाल्याचे श्री. उकीरडे यांनी सांगितले.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

 सलग दुसऱ्या वर्षीही दहावी परीक्षेत नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यातच कॉपीचे गैरप्रकार उघड झाले होते. गेल्यावर्षी मार्च २०१९ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील चाळीस प्रकरणांत ३९ विद्यार्थ्यांना शिक्षा तर एकाच निकाल जाहिर करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाचही प्रकरणात विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात आली. यंदाच्या परीक्षेतही नांदेड जिल्ह्यातील ७३ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ प्रकरणांत सर्व ९९ विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात आल्याचे श्री. उकीरडे यांनी सांगितले.    

(संपादन-प्रताप अवचार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC Result latur Divisin top in girl