धक्कादायक : कळंब स्टेट बॅकेचे दहा कर्मचारी पॉझिटिव्ह, तीन दिवसांपासून बॅंक बंद

दिलीप गंभीरे  
Saturday, 17 October 2020

शहरातील पूर्वीची स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद या बॅंकेत भारतीय स्टेट बॅंकेचे विलगिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे २० ते २२ हजार ग्राहकांची संख्या आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. कोरोनामुळे सततच्या टाळेबंदीमुळे व्यापारी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. कठीण परिस्थितीत व्यवसाय सुरू असताना मागच्या तीन दिवसांपासून बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने नवीनच प्रश्न व्यपाऱ्याच्या पुढे उभे राहीले आहेत

कळंब (उस्मानाबाद) : कळंब शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भारतीय स्टेट बॅंकेतील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मागच्या तीन दिवसांपासून बॅंकेच बंद ठेवण्यात आल्याने लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची कुचंबणा होत असून तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरणे हे कोणाच्या आदेशात आहे. असा संतप्त सवाल येथील व्यापारी, ग्राहकवर्गातून केले जात आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील पूर्वीची स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद या बॅंकेत भारतीय स्टेट बॅंकेचे विलगिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे २० ते २२ हजार ग्राहकांची संख्या आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. कोरोनामुळे सततच्या टाळेबंदीमुळे व्यापारी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. कठीण परिस्थितीत व्यवसाय सुरू असताना मागच्या तीन दिवसांपासून बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने नवीनच प्रश्न व्यपाऱ्याच्या पुढे उभे राहीले आहेत. बॅंकेचे व्यवहार बंद असल्याने पैसे ट्रान्स्फर करणे, पैसे ठेवणे काढणे, इतर बॅंकेला पैसे पुरविणे, शेतकरी व मजूर वर्गाचे छोटे-मोठे व्यवहार ठप्प झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बॅंक बंद असल्याचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला असून बॅंकेत पैसे अथवा व्यवहार होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. बॅंकेत बरेच तरुण अधिकारी कर्मचारी आहेत. बॅंकेतील १० व्यक्तीना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्याची आर्थिक घडी विस्कटली असल्याचे चित्र आहे. बॅंकेच्या वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलल्यास पॉझिटिव्ह कर्मचारी सोडून अन्य कर्मचारी बॅंकेचे कामकाज करू शकतात. बॅंक बंद ठेवण्यात आल्याने तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. अशा परिस्थितीत स्टेट बॅंक कोणाच्या आदेशाने तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली असा प्रश्न व्यापारी, ग्राहक उपस्थित करीत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रिझर्व बॅंकेने दखल घ्यावी 

कर्मचारी कोरोनामुळे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवस्था ढासळली आहे.तीन दिवसांपासून बॅंक बंद ठेवण्यात आल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने या गंभीर प्रकारची दखल घ्यावी अशी मागणी येथील व्यापारी संघटनेने केली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Bank of Kalamb Ten employees positive