निलंग्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार!

राम काळगे
Friday, 6 November 2020

निलंगा शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीला ऊत आला असून परवाना धारकाकडूनही नियमाचे राजरोसपणे उल्लघंन होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी 'अर्थपूर्ण' बोलणी करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. याबाबत वरिष्ठ आधिकार्यानी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. 

निलंगा (लातूर) : निलंगा शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीला ऊत आला असून परवाना धारकाकडूनही नियमाचे राजरोसपणे उल्लघंन होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी 'अर्थपूर्ण' बोलणी करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. याबाबत वरिष्ठ आधिकार्यानी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याबाबतची माहिती अशी की निलंगा शहरासह तालुक्यात एकून शंभरपेक्षा जास्त बिअरबार व परमिटरूम आहेत. बार व देशी दारू दुकानात सर्रासपणे नियमाचे उल्लघंन केले जात आहे. अनेक बारमध्ये शौचालय व प्रसाधन गृह नाहीत. शिविय चढ्या भावाने दारू विक्री केली जाते याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित बिअर बारमालकावर कोणत्याही दारू बंदी अधिकाऱ्यांची वचक राहीला नाही. फक्त महिण्याला येऊन 'अर्थपूर्ण' व्यवहार करून ते गायब होत असतात. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निलंगा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात हॉटेलच्या नावाखाली देशी, विदेशी, हातभट्टी विकली जाते. यांना राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी व कर्मचारी यांचा आशीर्वाद आहे. शहर व तालुक्यातील वैध व अवैध दारू विक्री करणाऱ्यासाठी राज्य उत्पादन विभागातील एक कर्मचारी हप्ते वसूलीसाठी खास 'कारभारी' म्हणून नियुक्त केला आहे. बनावट दारू ही संपूर्ण बार मध्ये विक्री केली जाते. मात्र याकडे राज्य उत्पादन शुल्क सपशेल कानाडोळा करत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील व ग्रामीण भागातील अनेक बार चालकांना वेळेचे बंधन नाही. कधीही चालू करत असतात. निळकंठेश्वर मार्केट मध्ये नागरिकांचा विरोध असताना देखील त्या ठिकाणी नवीन बारला परवानगी दिली आहे. तसेच शहरातील नवीन पर्यटनस्थळ, अटल वाकवे याला लागूनच एका बारला परवानगी दिली आहे. याबाबत नागरिकांनी लेखी तक्रार दिली आहे. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित उत्पादन शुल्क निरिक्षक कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करित आहेत. संबंधित बिअर बार मालकावर वचक नसल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मंत्र्यांकडे केली तक्रार
उत्पादन शुल्कचे अधिकारी श्री. झेंडे हे गेल्या अनेक वर्षापासून वरिष्ठांच्या कृपा आशीर्वादाने निलंग्यात तळ ठोकून आहेत. तसेच त्यांच्या कार्यकाळात अवैध धंदे व बेशुमार दारू विक्री वाढली आहे, यासंदर्भात शहरातील जागृत नागरिकांनी मंत्र्याकडे तक्रार केली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State excise department mismanagement Nilanga news