esakal | साहेब, पावसाने सगळच नेलं, शेतकऱ्यांना अश्रू अनावर; निलंग्यात राज्यमंत्र्यांचा पाहणी दौरा!
sakal

बोलून बातमी शोधा

Nilanga Nuksan.jpg
  • राज्यमंत्र्याच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना झाले अश्रू अनावर. 
  • आता कसं जगावं साहेब, वर्ष कसं लोटाव. एकाच पावसात सगळं वाहून गेल.
  • जनावराला काय घालावं?
  • चिखल तुडवित राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर. 
  • अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांची राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सावरी, मानेजवळगा, कासारसिरशी परिसरात केली पाहणी

साहेब, पावसाने सगळच नेलं, शेतकऱ्यांना अश्रू अनावर; निलंग्यात राज्यमंत्र्यांचा पाहणी दौरा!

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (लातूर) : आता कसं जगावं साहेब, वर्ष कसं लोटाव! एकाच पावसात सगळं वाहून गेलया ! जनावराला काय घालावं अशा निराशजनक प्रतिक्रिया सावरी, मानेजवळगा येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या होत्या. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर शुक्रवारी (ता.16) शेतकऱ्यांनी अनेक समस्या मांडून शासनाने पंचनाम्याला वेळ न दवडता त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तालुक्यातील सावरी, मानेजवळगा, कासारशिरसी यासह आदी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तेरणा नदी काठच्या शेतकऱ्यांची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश, जाधव कृषी विभागाचे अधिकारी, काँग्रेसचे अभय सोळंके यासह अनेक जण या दौर्‍यात उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तेरणा व मांजरा नदीकाठचा शेतकरी पूर्णता उध्वस्त झाला आहे. पात्राबाहेर पाणी पडून हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढून ठेवलेल्या सुड्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. फळपिकाच्या व बागायती क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो एकर उसाचे क्षेत्र पावसामुळे व चक्रीवादळामुळे आडवे पडले आहे. शिवाय चक्रीवादळामुळे काढून ठेवलेल्या गंजी मध्ये पाणी जाऊन सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनाम्यासाठी वेळ न दवडता सरसकट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून यावेळी करण्यात आली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

माने जवळगा, सावरी, सोनखेड, गुंजार्गा, येळनूर, लिंबाळा यासह आदी भागातील शेतकऱ्यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर समस्या मांडल्या. ते म्हणाले की सोयाबीन अतिवृष्टीमुळे भिजून गेल्यामुळे जनावरासाठी आता चारा नाही. शिवाय चक्रीवादळामुळे अनेक विद्युत पोल पडले. त्यामुळे गावासह शहरातील लाईटची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अतिवृष्टीमुळे गावातील रस्त्याची समस्या बिकट झाली. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून आपण शासनापर्यंत पोहोचवाव्यात व पंचनामामध्ये आता वेळ न घालता रससकट शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी निश्चितच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न शासन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी चिखल तुडवित थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यादरम्यान अनेक शेतकव महिला शेतकऱ्यांना आपल्या शेतातील परिस्थितीची माहिती सांगताना अश्रू अनावर झाले. आता वर्षभर कसे जगावे असा प्रश्न पडला आहे. जनावरांना चारा मिळणे अवघड आहे. अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर यावेळी मांडल्या. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, ऊस, हायब्रीड, पिवळा आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फळबागा फळ पिकाचे नुकसान झाले आहे शिवाय अद्याप पंचमी करण्यासाठी शासनाकडून आदेश नसले तरी सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)