लातूरकरांनो नियम मोडताय...जरा थांबा...नाहीतर..! 

सुशांत सांगवे
शनिवार, 4 जुलै 2020

 
जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस उतरणार रस्त्यावर; बेशिस्त नागरिकांवर सोमवारपासून आणखी कडक कारवाई

लातूर : तुम्ही घराबाहेर पडताय पण; तुमच्या चेहऱ्यावर मास्क नसेल किंवा तुमच्या दुचाकीवर साथीदार असेल तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी खिशात खास दंडासाठी पाचशे ते हजार रुपये राखून ठेवावे लागणार आहेत. खिशात पैसे नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

या कारवाईसाठी पोलिस अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच स्वत: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे कोरोना काळात नियम न पाळणाऱ्या बेशिस्त लातूरकरांना शिस्त लागेल आणि कोरोनाचा फैलाव आटोक्यात राहील, अशी आशा निर्माण झाली आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने दुचाकीवरून केवळ एकालाच प्रवास करण्याची परवागनी दिली. मात्र, शहर व जिल्ह्यात आदेशाचे उल्लंघन करून अनेकजण डबल व ट्रिपलसीट फिरत आहेत. इतर वाहनांमध्येही प्रवाशांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्याचेही पालन होताना दिसत नाही. याबरोबरच चेहऱ्याला मास्क न बांधता बाहेर फिरण्याचे प्रमाण वाढत आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

अशांविरोधात सोमवारपासून (ता. ६) कठोर कारवाई होणार आहे, अशी माहिती जी. श्रीकांत  यांनी जाहीर केली. याबाबतचा आदेशही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. दुसरीकडे, पोलिस आणि पालिकेने गेल्या २ दिवसांपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरवात केली आहे. ती आता सोमवारपासून व्यापक स्वरुपात होणार आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक  

पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे म्हणाले, पोलिस आणि पालिकेची एकत्र १२ पथके आम्ही तैनात केली आहे. या पथकांकडून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई नक्कीच आणखी वाढवली जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे, नियमांचे पालन करावे. तरच कोरोनाबाधितांची संख्या कमी होईल.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

तीन दिवसांत २ लाखांचा दंड
मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर तसेच फिजिकल डिस्टंसिंगचे पालन होत नसलेल्या व्यावसायिकांवर पोलिस प्रशासनाच्या मदतीने पालिका दंडात्मक कारवाई करत आहे. मास्कचा  वापर न करणाऱ्या नागरिकांना दंड आकारून मोफत मास्क देत आहे. मागील ३ दिवसांत १ लाख ७५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांना मास्क वापरण्याची सवय लागावी व फिजिकल डिस्टंसिंगचे पालन व्हावे हा या मागील उद्देश आहे, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
 

 

डबल व ट्रीपलसीट धावणाऱ्या दुचाकीचालकांच्या विरोधात मोठा दंड तसेच दुचाकी जप्तीची कारवाई होणार आहे. डबल सीट असलेल्या महिला व बालकांना अपवादात्मक स्थितीत सवलत देण्यात येणार आहे. या कारवाईसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरणार आहे.
जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरूच आहे. पण, आता अधिक प्रमाणात आणि शहराच्या वेगवेगळ्या भागांत कारवाई होईल. अशा वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत.
डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strick action from Monday inlatur city