esakal | मराठवाड्यात 'इन्स्पायर अवॉर्ड'साठी शाळेसह विद्यार्थ्यांचा 'नो रिस्पॉन्स'!
sakal

बोलून बातमी शोधा

inspire award.jpg


विद्यार्थी लाखोच्या संख्येत, नोंदणी दोन हजारपेक्षा कमीच.  

मराठवाड्यात 'इन्स्पायर अवॉर्ड'साठी शाळेसह विद्यार्थ्यांचा 'नो रिस्पॉन्स'!

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना : शालेय विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणिव निर्माण होण्यासाठी दरवर्षी 'इन्स्पायर अवॉर्ड' उपक्रम राबविला जातो. यंदा मात्र कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने या उपक्रमाच्या नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून येत आहे. पाच जिल्ह्यात लाखो विद्यार्थी असताना केवळ दोन हजार विद्यार्थ्यांनी सुद्धा नोंदणी केलेली नाही, हे विशेष. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शालेय शिक्षणात विद्यार्थ्याना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी दरवर्षी 'इन्स्पायर अवॉर्ड ' विज्ञान प्रदर्शनाचे जिल्हा, विभाग राज्यासह देश पातळीवर आयोजन करण्यात येते. इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात शाळेतील दोन किंवा तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जातात. या पैशातून विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाच्या मदतीने कल्पक दृष्टिकोन ठेवून एखादे उपकरण व मॉडेल तयार करावे लागते. सध्या इन्स्पायर अवॉर्ड साठी शाळांना ऑनलाइन माहिती भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे. परंतु मराठवाड्यात मात्र शाळांची उदासिनता दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाड्यात शालेय शिक्षणात सहावी ते बारावीपर्यंत लाखो विद्यार्थी आहेत. परंतु सध्या 'शाळा बंद ऑनलाइन अभ्यास' सुरु आहे. असे असले तरी मराठवाड्यात विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीस उदासिनता दिसून येत आहे. मराठवाड्यातील शिक्षणाधिकारी आपल्या जिल्ह्यातील शाळांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सारख्या सूचना देत असल्याचे अनुभव आहे. शिक्षणाधिकारी सूचना व आदेश देत असले तरी शाळांची उदासीनतेमुळे ऑनलाइन नोंदणीस अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार (शाळेंची नोंदणी)

  • बीड जिल्हा - ६६६
  • परभणी   - ३१२
  • औरंगाबाद - १७०
  • जालना - १५८
  • हिंगोली - ८९ 

आम्ही मुलांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्य़ात शाळांनी सहभागी व्हावे अशा सूचना शिक्षणाधिकारी देत आहे. 
मधुकर गायकवाड, विज्ञान शिक्षक. 

(संपादन-प्रताप अवचार)