वडीलांच्या कष्टाची अभिषेकने ठेवली जाण, मेहनतीने मिळविला मुंबईत वैद्यकीय प्रवेश!

ABHISHEK.jpg
ABHISHEK.jpg

अहमदपूर (लातूर) : वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचा अवघड वाटणारा मार्ग माझ्या परिस्थितीने सहज साध्य करता आला. आई वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मी अभ्यास केला. वैद्यकीय प्रवेश पुर्व परिक्षेत यश मिळवले व वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र झालो असे मत अभिषेक मोहन जोशी या विद्यार्थ्यांने मांडले.

संगीता मोहन जोशी व मोहन सोपान जोशी हे दाम्पत्य रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील रहिवासी. मोहनराव हे भूमिहीन असून पत्नी, एक मुलगा एक मुलगी असे चार जणांच्या संसाराचा गाडा ते भाजीपाला विक्री करुन चालवितात. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे वीस वर्षांपूर्वी चप्पल विक्री व्यवसाय सुरू केला. 

या व्यवसायातून मिळणारी मिळकत कुटुंबाचा खर्च भागेल एवढा होत नसल्याने त्यांनी तीन वर्षांपूर्वी हॉटेल व्यावसाय चालू केला. परंतु कोरोनाने या व्यवसायावर बंदी आली. ऐन बारावीच्या वर्षात मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झाले. असे म्हणतात की, परिस्थिती माणसाला मार्ग दाखवित असते. नुसार जोशी दाम्पत्यांनी भाजीपाला विक्री चालू केली. या व्यवसायातून होणा-या आर्थिक मिळकतीतून मुलाच्या शिक्षणाचा मासिक खर्च चार हजार व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना कसरत करावी लागायची. आपल्या सारखं हालाकीच जीवन मुलाने जगू नये हा एकच ध्यास. वडीलांच्या मेहनतीचे अभिषेकनेही सोनं केल. 

अभिषेकचे पहिले ते सहावी पर्यंतचे शिक्षण किनगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात झाले. सातवी ते दहावी पर्यंत अहमदपूर येथील यशवंत विद्यालय. दहावीला 98 टक्के घेऊन आकरावीत राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतला. या साठी लागणारा खर्च ही परवडणारा नव्हता. परंतू शिक्षण हाच मुलाच्या भविष्याचे आधार आहे, असा निश्चय मोहनराव यांनी केलेला होता. त्यांनी मेहनतीने मूलाला शिकविले. अभिषेकने देखील जीवतोड मेहनत घेतली. नुकत्याच लागलेल्या नीट परिक्षेतील घवघवीत यश मिऴविले. त्यात मुंबई येथील कुपर मेडिकल कॉलेजला त्याने प्रवेश मिळविला आहे. 

शाहू कॉलेज मधील शिक्षणाशिवाय मी कोणतीही खाजगी शिकवणी लावली नाही. मला माझ्या आई वडिलांची हालाखीची परिस्थिती नेहमीच खुणावत होती. मी अभ्यासात नियमीतता ठेवली. अभ्यासातील सातत्य व जिद्द यामुळे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पात्र झालो. -अभिषेक जोशी

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com