Video : संभाजी महाराजांवरील मालिकेचे पुढचे भाग दाखवू नका : शिवसेना नेते

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत सध्या संभाजी महाराजांना अटक केल्याचा प्रसंग दाखवला जात आहे. यापुढे संभाजी महाराजांच्या आयुष्यात काय घडले, कोणते प्रसंग आले, ते सर्वानाच माहित आहे.

औरंगाबाद : संभाजी महाराजांच्या जीवनावरील टीव्ही मालिका सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. इतिहास बदलता येत नाही, हे जरी खरे असले, तरी या मालिकेचे पुढचे भाग आता दाखवू नयेत, असं आवाहन माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे जालना येथील नेते अर्जुन खोतकर यांनी मालिकेच्या निर्मात्यांना केली आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत सध्या संभाजी महाराजांना अटक केल्याचा प्रसंग दाखवला जात आहे. यापुढे संभाजी महाराजांच्या आयुष्यात काय घडले, कोणते प्रसंग आले, ते सर्वानाच माहित आहे. मालिकेच्या पुढच्या भागात आता तेच दाखवले जाणार असताना नवाच वाद उद्भवला आहे. 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

या मालिकेचे पुढचे भाग दाखवू नका, असं आवाहन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मालिकेच्या निर्मात्यांना केलं आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

जालना इथं एका शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना खोतकर यांनी ही मागणी केली आहे. डोळ्यांमध्ये सळ्या घालणं, पाय तोडणं, हे प्रकार कोणत्याही संभाजी महाराज प्रेमीला पाहायला आवडणार नाहीत. त्यामुळे इतिहास बदलता येत नाही, हे जरी खरं असलं, तरी मालिकेत आता ते दाखवू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swarajya Rakshak Sambhaji TV Serial Row Arjun Khotkar Jalna News