BIG NEWS : आता गुरुजींसाठी ऑनलाइन क्लासरुम..! वाचा पहिल्या टप्प्यात राज्यातील किती शिक्षकांना होणार लाभ 

onlien.jpg
onlien.jpg

जालना : कोरोना संसर्गजन्य घटनेमुळे शाळा प्रत्यक्ष सुरू कधी होतील याबाबत अनिश्चितता आहे. परंतु शिक्षण प्रक्रिया प्रभावाने सुरू राहावी, या दृष्टीने राज्यातील गुरुजींसाठी आता ऑनलाइन क्लासरुम सुरू होणार आहे, हे विशेष.   

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गजन्य घटनेमूळे संचारबंदी लागू आहे. यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहे. शिक्षण प्रक्रिया सुरू असली तरी विद्यार्थी शिक्षक प्रत्यक्ष संवाद होत नाही. ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया अधिक गतीने सुरू व्हावी आणि विद्यार्थी सहभाग वाढावा यासाठी आता शिक्षकांना राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील शिक्षकांसाठी गुगल क्लासरुम ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी (ता. ११) जाहीर करण्यात आला आहे.

 शाळा, विद्यार्थी, ऑनलाइन अध्यापन, गृहपाठ व सूचनांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. राज्यातील शिक्षकांसाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळपास ४५ हजार शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढील टप्प्यात राज्यातील खाजगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. सदर प्रशिक्षणासाठी  शिक्षक तंत्रस्नेही असावा, इंटरनेट, दोन मोबाईल, संगणकासह लॅपटॉप असणे आवश्यक आहे.

 राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांना ऑनलाइन सहभागासाठी सोमवारी (ता. १३ ) नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नोंदणी करताना शिक्षकाची संपूर्ण माहिती, मेल आयडी यासह इतर भरावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शिक्षण प्रक्रिया अधिक गतीने सुरू व्हावी यासाठी शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे संचालक दिनकर पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. 


शिक्षकांचे ऑनलाइन प्रशिक्षणास नावनोंदणी केली आहे. राज्यपातळीवरील प्रशिक्षण असल्याने याचा निश्चितच फायदा होईल असे वाटते. 
 संतोष लिंगायत, सायगाव डोंगरगाव

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com