esakal | CoronaUpdate: उस्मानाबाद जिल्ह्यात १० पाॅझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जिल्हा सामान्य रुग्णालयातून गुरुवारी (ता.चार) लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ७४ नमूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी दहा पॉझिटिव्ह, एक इनक्लुझिव व ६३ निगेटिव्ह आले आहेत. तसेच उस्मानाबादेतील काकानगर भागातील सातजण पॉझिटिव रुग्ण असून हे सर्वच पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत.

CoronaUpdate: उस्मानाबाद जिल्ह्यात १० पाॅझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद: जिल्हा सामान्य रुग्णालयातून गुरुवारी (ता.चार) लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ७४ नमूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी दहा पॉझिटिव्ह, एक इनक्लुझिव व ६३ निगेटिव्ह आले आहेत. तसेच उस्मानाबादेतील काकानगर भागातील सातजण पॉझिटिव रुग्ण असून हे सर्वच पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत.

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

दोन पेशंट शिराढोण (ता.कळंब) येथील आहेत व एक रुग्ण सोन्नेवाडी (ता.भूम) येथील असून दहा दिवसांपूर्वी घाटकोपर मुंबई येथून आलेली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्येने आता शतक पूर्ण केले आहे. संख्या १०४ जण झाले आहेत. दररोज ही संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. तर बाधित झालेल्यापैकी ४६ जण बरे होऊन घरी गेले होते. जिल्ह्यामध्ये आता सहा हजार ७९३ इतक्या संशयितांची संख्या आहे,

त्यातील सहा हजार ७३८ इतके लोक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. पाच हजार ५३२ होम तर एक हजार २०६ लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत चार हजार ५७१ जणांचा चौदा दिवसाचा क्वारंटाईन काळ पुर्ण झाला आहे. तर एक हजार ६५८ इतक्या लोकांना रोगमुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत एक हजार ७८५ लोकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

हेही वाचा- वीजेचा शॉक लागून २६ मेंढ्यांचा मृत्यू 

त्यातील १०४ पॉझीटिव्ह आले तर एक हजार ५०१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये तीन बाधित रुग्ण हे परजिल्ह्यामध्ये बाधित झाले असुन जिल्ह्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तीन जण मयत झाले असुन दोघांचा मृत्यु उस्मानाबादमध्ये झाला असुन एकाचा उमरगा येथे झाला होता. उस्मानाबाद तालुक्यातील एक, कळंब तालुक्यातील व उमरगा तालुक्यातील एक अशा तिघांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यु झाला आहे. 

असा आहे कोरोना मीटर 
बाधित रुग्ण तालुकानिहाय - ९४
उस्मानाबाद - ३९
तुळजापुर - ०४
उमरगा - १६
लोहारा - ०६
कळंब - २१
वाशी - ०४ 
भुम - ०३ 
परंडा - ११

हेही वाचा- CoronaVirus : हंगेरीत अडकलेला औरंगाबादचा विद्यार्थी गंभीर आजारी

loading image