लूटमार करणारे तिघे जाळ्यात, ३४ मोबाईल, पावणेचार लाखांचा माल जप्त ! 

beed crome.jpg
beed crome.jpg

बीड : महामार्गावर वाहने व नागरिकांना अडवून लुटणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीचे ३४ मोबाईल फोनसह एक दुचाकी असा तीन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. सहा) ही कारवाई केली. 


श्रावण गणपत पवार, रामा अमृतराव साळुंके व सय्यद जावेद सय्यद जाफर (सर्व रा. नवगण राजुरी, ता. जि. बीड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. ता. ३० सप्टेंबर रोजी पुण्याहून नांदेडकडे कारमधून जात असलेले दिलीप मधुकर उबाळे (रा.नांदेड) यांना अंमळनेर परिसरामध्ये चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी अंमळनेर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.

दरम्यान बीड शहरालगतच्या पालवण शिवारात गेलेल्या काही व्यक्तींना धाक दाखवून त्यांचे जवळील नगदी रुपये, मोबाईल व सोन्याचे दागिनेही चोरट्यांनी लंपास केले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रावण पवार, रामा साळुंके व सय्यद जावेद यांना एका दुचाकीसह ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे चोरीचे ३४ मोबाईलफोन आढळून आले. चौकशीत पाच-सहा दिवसांपूर्वी डोंगरकिन्ही ते चुंबळी जाणारे रोडवरील घाटात वाहने अडवून वाहनातील लोकांकडून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

तसेच बीड शहरालगत इतर ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक भारत राऊत, सायबर सेलचे निरीक्षक रवींद्र गायकवाड, सहाय्यक पोलिस ननिरीक्षक आनंद कांगुणे, फौजदार गोविंद एकिलवादे, तुळशीराम जगताप, शेख सलीम, बालाजी दराडे, रवींद्र गोले, श्रीमंत उबाळे, मनोज वाघ, विकास वाघमारे, राहुल शिंदे, प्रसाद कदम, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, युनूस बागवान, सखाराम पवार, नरेंद्र बांगर, विक्की सुरवसे, चालक अतुल हराळे, संतोष हारके यांनी ही कारवाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com