esakal | ऐकावं ते नवलच..! सर्पमित्रांनी केले बाळंतपण..! कोब्रा जातीच्या तब्बल बावीस पिल्लांचा झाला जन्म..! 
sakal

बोलून बातमी शोधा

sap.jpg

कृत्रिम पद्धतीने अंडी उबवून कोब्रा जातीच्या पिल्लांचा झाला जन्म, सर्पमित्रांनी पुढाकार घेऊन दिले जीवदान

ऐकावं ते नवलच..! सर्पमित्रांनी केले बाळंतपण..! कोब्रा जातीच्या तब्बल बावीस पिल्लांचा झाला जन्म..! 

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (बीड) : तालुक्यातील युसूफवडगाव येथील दोन सर्प मित्रांनी कृत्रिम पद्धतीने कोब्रा जातीच्या सापाची अंडी उबवून थोड्या तितक्या नव्हे तर बावीस पिल्लांना जन्म दिला आहे. त्यानंतर त्या सर्व सापाच्या पिल्लांना नैसर्गिक वातावरणात निर्मणुष्य जागी सोडून दिले आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

साधारणतः साप किंवा नाग म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगाचा  थरकाप उडतो. मात्र युसूफवडगाव येथील सर्पमित्र आकाश वैरागे व अक्षय वैरागे यांना धनेगाव येथून घरात साप असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले. क्षणाचाही विलंब न करता ते त्याठिकाणी पोहचले. मात्र ते पोहोचण्यापूर्वी तो साप निघून गेला होता. तरीही त्या सर्पमित्रांनी घराच्या आजूबाजूला त्या सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बराच शोध घेऊनही साप आढळला नाही. मात्र त्यांना त्या ठिकाणच्या एका बिळात क्रोबा जातीच्या सापाची तब्बल बावीस अंडी आढळली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

त्यांनी ती अंडी सुरक्षित अलगदपणे बाहेर काढून घरी आणून कृत्रिम पद्धतीने उब दिली. उब देण्याचा कालावधी पुर्ण होताच तीन-चार दिवसांपूर्वी त्या अड्यांतून क्रोबा जातीच्या बावीस पिल्लांनी जन्म घेतला आहे. अशाप्रकारे सर्पमित्रांनी घेतलेल्या काळजीमुळे या अंड्यांना कुठलीही इजा झाली नाही. त्यामुळे कोब्रा जातीच्या सापाच्या बावीस पिल्लांना जीवदान मिळाले आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

त्यानंतर या सर्व सापाच्या पिल्लांना निसर्गाच्या सान्निध्यात निर्मणूष्य असलेल्या जागी सोडून देण्यात आले. वैज्ञानिक दृष्टीकोनातून साप हा अन्न साखळीचा घटक असून तो शेतकऱ्यांचा खरा मित्र असल्याने तो दिसला असता त्याला न मारता भ्रमणध्वनी क्रमांक  संपर्क करण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

(संपादन : प्रताप अवचार)