esakal | तीन दुचाकीसह दोन चोरटे गजाआड, गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

0Crimenews_13

चोरलेल्या दुचाकीवरून फिरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शनिवारी (ता.२६) बेड्या ठोकल्या. ही कारवाई तालुक्यातील नांदूरफाटा येथे करण्यात आली.

तीन दुचाकीसह दोन चोरटे गजाआड, गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : चोरलेल्या दुचाकीवरून फिरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शनिवारी (ता.२६) बेड्या ठोकल्या. ही कारवाई तालुक्यातील नांदूरफाटा येथे करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून दुकानफोडीचे दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत.
मधुकर गणपत काळे (रा. सावळेश्वर पैठण, ता. केज), देविदास बन्सी काळे (रा. बनसारोळा, ता. केज) अशी संशयितांची नावे आहेत. ते दोघे चोरीच्या दुचाकीवरून शनिवारी केजहून नांदूरफाटा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांना मिळाली होती.

त्यावरून दुचाकीचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक भास्कर नवले, पोलिस कर्मचारी नरेंद्र बांगर, श्रीमंत उबाळे यांनी सापळा लावून त्यांना पकडले. त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. 'खाक्या' दाखविल्यावर त्यांनी तोंड उघडले. काही दिवसांपूर्वी नेकनूर ठाणे हद्दीतील येळंबघाट येथून त्यांनी ही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय दिंद्रूड व लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याचेही मान्य केले. ७८ हजार किमतीच्या तीन दुचाकींसह त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.हेच दुकानफोडीच्या गुन्ह्यातलेही फरार
मधुकर काळे व देविदास काळे हे दोघे अट्टल गुन्हेगार आहेत. धारूर येथे बिअर शॉपी तर दिंद्रूड येथे एका दुकानात त्यांनी चोरी केली होती. या दोन्ही गुन्ह्यांत ते निष्पन्न झाले होते; परंतु पोलिसांना गुंगारा देत फिरत होते.

loading image