Corona Breaking : उदगीरात कोरोनाचा कहर सुरुच, एकाच दिवशी अकरा पॉझिटिव्ह

corona.jpg
corona.jpg

उदगीर : शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाने कहर केला आहे. गुरुवारी (ता.९) एकाच दिवशी अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
गुरुवारी नळगीर (ता. उदगीर) येथील आठ जणांना शहरातील शिवनगर येथील दोन जणांना तर गुडसूर (ता. उदगीर) येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी गुरूवारी सकाळी लातूरला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री साडेदहाच्या सुमारास प्राप्त झाल्याची माहिती कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

शहरालगत असलेल्या एसटी कॉलनी येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाचा गुरुवारी लातुरातील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाने मृत्यू झाला. गेल्या तब्बल नऊ दिवसापासून मृत्यूची शृंखला सुरू झाली असून मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. १ जुलै ते ९ जुलै दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उदगीर शहर व परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

येथील कोविड रुग्णालयात एकूण रुग्णांची संख्या १५१ एवढी झाली असून १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून पंचवीस रुग्णांवर येथील कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत.दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आता हॉटेल व्यवसायाची भर


बाजारपेठेत अगोदर सर्व आस्थापनांना परवानगी दिल्याने गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आता त्यात आजपासून हॉटेल व्यवसायाची भर पडल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होणार आहे.

संपादन प्रताप अवचार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com