Corona Breaking : उदगीरात मृत्यू तांडव सुरुच; सकाळीच दोन जणांचा मृत्यू, १३ रूग्ण वाढले

युवराज धोतरे 
Saturday, 25 July 2020

येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देगलुर रोडवरील समर्थ कॉलनी येथील एका  बासष्ट वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्तीचा  शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला आहे. धनेगाव (ता.देवणी) येथील पंचेचाळीस वर्षे वय असलेल्या सारीच्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. याचा कोरोना अहवाल प्रलंबित आहे. 

उदगीर (लातूर) : येथील कोरोना रुग्णालयात शनिवारी (ता.२५) रोजी पहाटेच्या सुमारास कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बळीमुळे उदगीर शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देगलुर रोडवरील समर्थ कॉलनी येथील एका  बासष्ट वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्तीचा  शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला आहे. धनेगाव (ता.देवणी) येथील पंचेचाळीस वर्षे वय असलेल्या सारीच्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. याचा कोरोना अहवाल प्रलंबित आहे. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्युचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक बनले आहे. दररोज नवीन संपर्काचे संदर्भच बदलत असलेले रुग्ण दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणानाही चकित झाली आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर २३८, जळकोट ३, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ३, हैदराबाद १, मुखेड ४, देवणी ५, बिदर १ अशा कोरोणाची बाधा झालेल्या २६६ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी १९ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी १६० रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे.अकरा रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविंड रुग्णालयात ३८ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ३२ रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

एका दिवसात तेरा रुग्णांची वाढ

येथील कोरोना रुग्णालयात शुक्रवारी (ता.२४) आलेल्या अहवालानुसार एकूण तेरा कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील विकास नगर ३, नांदेड रोड १ खडकाळी गल्ली १ पोलीस ठाणे ग्रामीण २, समता नगर १, गांधी नगर १, कबीर नगर १, मलकापूर १, निडेबन रोड १, हेर १ अशा तेरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकूण सात जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत.

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer city corona update two death and 11 new corona patient