कोरोना मुक्तीसाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा : जी. श्रीकांत 

udgeer 16.jpg
udgeer 16.jpg

उदगीर (लातूर) : यावर्षी गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे मोठी सावट आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करावा. यानिमित्त गणेश मंडळांनी कोरोना मुक्तीसाठी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले.

येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता.१६) पोलीस विभागाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, तहसीलदार वेंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी मुळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, प्रा. श्याम डावळे, बाजार समतीचे उपसभापती रामराव बिरादार, पंचायत समितीचे उपसभापती  बाळासाहेब मरलापल्ले, सार्वजनिक गणेश महामंडळाचे कार्याध्यक्ष अँड. गुलाब पटवारी, शहर पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, यावर्षी कोणत्याही गणेश मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी दिली जाणार नाही. यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग वाढू न देता तो आटोक्यात आणण्यासाठी गणेश मंडळांनी काम करावे. यावेळी श्री जाधव म्हणाले यावर्षीचे कोरोनाचे संकट लक्षात घेऊन पोलीस विभागाला सर्वांनी सहकार्य करावे. मिरवणुकीचा आग्रह धरू नये. गणेश मंडळांनी आपापल्या मंडळासमोर गर्दी न करता पाण्याच्या टाकीचा वापर करून कृत्रिम विसर्जन करावे. यावेळी उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संधीकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, श्री एडके, मंजूरखा पठाण आदी यावेळी उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे  यांनी सूत्रसंचालन केले.

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com