esakal | उमरग्यात बाधितांची संख्या आठशेपार; तीन दिवसात सात जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona death new.jpg

रात्री आलेल्या अहवालात ३२ जण पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने ५४ दिवसात बाधितांची संख्या आठशेपार गेली आहे. दरम्यान बुधवारी (ता.१९) तलमोड, कसगी, उमरगा शहरात दोन तर येणेगुर येथील एक तर गुरुवारी (ता.२०) दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उमरग्यात बाधितांची संख्या आठशेपार; तीन दिवसात सात जणांचा मृत्यू

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा : उमरगा शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी (ता. २०) मुरूम येथे घेतलेल्या अन्टीजेन टेस्टमध्ये दोघे पॉझिटिव्ह आले. तर रात्री आलेल्या अहवालात ३२ जण पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने ५४ दिवसात बाधितांची संख्या आठशेपार गेली आहे. दरम्यान बुधवारी (ता.१९) तलमोड, कसगी, उमरगा शहरात दोन तर येणेगुर येथील एक तर गुरुवारी (ता.२०) दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. उमरगा शहरात ४७६ तर ग्रामीण मध्ये ३४५ रूग्ण संख्या झाली आहे. आत्तापर्यंत २८ पॉझिटिव्ह तर दोन निगेटिव्ह रुग्णाचा मृत्यु झाला आहे. ४९० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून ३०१ जणावर उपचार सुरू आहेत. बुधवारी पाठविलेल्या स्वॅबचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला. त्यात ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून शहरात बारा रुग्ण आहेत त्यात माशाळाकर गल्ली चार, चिंचोळे गल्ली दोन, एकोंडी रोड चार, न्यू आदर्श कॉलनी एक, बालाजी नगर एक तर ग्रामीणमधील सोळामध्ये मुरूम एक, तुरोरी तीन, महालिंगरायवाडी सात, येणेगुर दोन भुयार चिंचोली एक, काटेवाडी एक तलमोडचा एक व कर्नाटकातील मंठाळ, तडकल, आळंगा, आनंदवाडी येथे प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आले आहेत.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

तीन दिवसात सात जणांचा मृत्यू
बुधवारी सरकारी कोविड रुग्णालयात तलमोडच्या जेष्ठ नागरिकाचा व उमरगा शहरातील महादेव गल्लीतील एका महिलेचा मृत्यू झाला. खाजगी कोविड रुग्णालयात कसगीच्या जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. शहरातील जुनी पेठेतील दुर्धर आजाराने पिडीत असलेल्या एका महिलेचा अहवाल प्रारंभी पॉझिटिव्ह व नंतर निगेटिव्ह आला मात्र उपचारादरम्यान सरकारी कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. येणेगूरच्या एका जेष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. गुरुवारी सरकारी कोविड रुग्णालयात नदी हत्तरग्याचा (ता. निलंगा) येथील पंचावन्न वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान पंधरा दिवसाने मृत्यू झाला. आळंगा (ता.आळंद ) येथील ६८ वर्षीय नागरिकाचा शुक्रवारी (ता.२१) सकाळी खाजगी कोविड रूग्णालयात मृत्यु झाला.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात 

अन्टीजेन चाचणीत ७९ पॉझिटिव्ह
गेल्या पंधरा दिवसात अन्टीजेन चाचणीचे प्रमाण वाढले आहे. उमरग्यात एक हजार २१४ चाचणीत ३७ तर मुरुममध्ये झालेल्या ३३१ चाचणीत ४२ पॉझिटिव्ह असे एकुण ७९ पॉझिटिव्ह रुग्ण आले होते. दरम्यान गुरुवारी उमरग्यात ३९ तर मुरुमध्ये पंधरा जणांचा स्वॅब घेण्यात आला आहे. तर बुधवारच्या ५६ स्वॅबचा अहवाल प्रतिक्षेत होता.


(संपादन-प्रताप अवचार) 

loading image
go to top