धोकादायक..! परिपूर्ण उपचाराअभावी उमरग्यात कोरोनाबाधितांचा होतोय मृत्यू ! 

अविनाश काळे
Saturday, 25 July 2020

उमरगा : उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयातील परिपूर्ण सुविधा कधी होणार ; महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काय झाले !

उमरगा : शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा धोका अजून टळलेला नाही. गेल्या २८ दिवसात तर रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकामध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरातील कोविड रूग्णालय रुग्णांसाठी आधारवड ठरत असले तरी कांही प्रोटोकॉलमुळे गंभीर रुग्णांना अपुऱ्या व सक्षम आरोग्य सुविधे अभावी मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील तीन खाजगी रुग्णालये कोविड रुग्णावर उपचारासाठी सुरू करण्याची सूचना तहसीलदार यांनी दिली मात्र रुग्णालयातील कांही अडचणीमुळे तूर्त आरोग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबातील गंभीर झालेल्या कोविड रुग्णांवर उपचारासाठी होणारी परवड कांही केल्या थांबत नाही. कोविड रुग्णालयात गंभीर आजाराच्या रूग्णांतील कमी झालेल्या ऑक्सीजन पुरवठ्यासाठी एकच व्हेंटिलेटर असल्याने ऐनवेळी उस्मानाबादच्या शासकिय रुग्णालयाकडे रेफर केले जाते. मात्र रेफर केलेले रुग्ण दगावण्याचे अनेक प्रकार घडताहेत. सोलापूर व लातूरच्या महागड्या खाजगी रुग्णालयातील उपचारासाठी ज्यांची आर्थिक ऐपत नसल्याने शासकिय अनास्थामुळे सामान्य रुग्ण मृत्यूला कवटाळाहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

दरम्यान श्वसनाचा त्रास होत असल्याने शहरातील चिंचोळे कार्यालयातील ५३ वर्षीय व्यक्ती कोविड रुग्णालयात दाखल झाला. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला गुरुवारी (ता.२३) उस्मानाबादच्या शासकिय रुग्णालयाला पाठविण्यात आले मात्र रात्री आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशा गंभीर रुग्णांचे आणि किती बळी जातील याचा अंदाज नाही मात्र आरोग्य विभागाकडून स्थानिक पातळीवर सक्षम आरोग्य सुविधा देण्यासाठी आणखी किती दिवस विलंब लावणार आहे याबाबत नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!  
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काय झाले !
शहरातील खाजगी रुग्णालयात सध्या कोविड रुग्णावर उपचार होत नाहीत. त्यांनाही प्रशासनाच्या अनेक निर्बंधामुळे अडचणीला सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी मंगळवारी (ता.२१)घेतलेल्या आढावा बैठकीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे केंद्र असलेल्या तीन खाजगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू करण्यासंदर्भात आदेशित केले होते. तहसीलदार संजय पवार यांनी तीनही रूग्णालयांना तशी सूचना केली आहे. मात्र अजून प्रत्यक्षात ही सोय झालेली नाही.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम

जनआरोग्य केंद्रातीलही कांही अडचणी यानिमित्ताने आता समोर येत आहेत. कोण म्हणतय स्टॉप नाही, कोण म्हणतय कोविडसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सोयी नाहीत. प्रशासनानेही या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. खाजगी डॉक्टर्सनीही आरोग्य सुविधा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दाखवावी यातून सामान्य कुटुंबातील गरिब रूग्णांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या केंद्रात कोविड रुग्णावरील उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, त्यांना यंत्रणा उभी करण्यासाठी कांही दिवसाचा अवधी
दिला आहे, त्या वेळेत त्यांनी पूर्ण कराव्यात. कठीण काळात या ठिकाणी कोविड रुग्णावर उपचार होणे आवश्यक असून हयगय चालणार नाही.
विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga Kovid Hospital Lack of facilities death ratio increase