उमरगा : कोविड रुग्णालयाची क्षमता आता शंभर बेडची, बाधितांचे त्रिशतक पार

अविनाश काळे
Friday, 31 July 2020

  • पॉझिटिव्ह रुग्णांना संपर्क होत नसल्याने उडतोय गोंधळ
  • उमरगा- खाजगी कोविड रुग्णालयालाही मान्यता 
  • उमरगा- उपजिल्हा रुग्णालय फक्त कोविडसाठी
  • ११५ जणांना मिळाला डिस्चार्ज

उमरगा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने उपजिल्हा रुग्णालयातील पन्नास बेडच्या कोविड रुग्णालयाची क्षमता वाढवून शंभर बेडचे करण्यात आले आहे. येथील शेंडगे रुग्णालयाला खाजगी कोविड रुग्णालयाची मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनातील गोंधळामुळे कांही पॉझिटिव्ह रुग्णांचा संपर्क होऊ शकला नसल्याने धोका निर्माण झाला आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम  

गेल्या चार दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने आरोग्य, महसूल, पालिका व पोलिस यंत्रणा हतबल झाली. गुरुवारी (ता.३०) रात्री आलेल्या ४६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी जवळपास पंधरा ते ते वीस लोकांचा संपर्क होऊ शकला नसल्याने गोंधळ उडाला, आरोग्य विभागावर असलेला कामाचा ताण यामुळे या गोष्टी घडत असल्या तरी पॉझिटिव्ह रुग्णांना मोकळे कसे सोडता येईल हा प्रश्न आहे, कांही जणांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांनी त्या रुग्णांना रुग्णालयात पाठविले. संपर्क न झालेल्या रुग्णांची यादी प्राप्त झाली तर संबंधित रुग्णांना तातडीने बोलवता येईल असे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले तर वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे यांनी चार दिवसात रुग्णालयाबरोबरच बाहेरच्या ठिकाणी मोठ्या संख्येने घेतलेल्या स्वॅबमुळे कामाचा ताण वाढल्याचे सांगून रुग्णांशी संपर्क सुरू असल्याचे सांगितले. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

उपजिल्हा रुग्णालय फक्त कोविडसाठी
रूग्ण संख्या वाढल्याने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णांसाठी करण्यात आले असून शनिवारपासुन (ता.एक) रुग्णांवर तेथे उपचार करण्यात येणार आहे. शिवाय प्रशासनाने येथील साठ बेडची क्षमता असलेले शेंडगे रुग्णालय खाजगी कोविड रुग्णालय म्हणुन नुकतीच मान्यता मिळाली आहे, तेथे कोविड रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे करता येईल असे डॉ. बडे यांनी सांगितले. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

अंटीजेन टेस्टसाठी किट्स उपलब्ध होईनात
शहरात सर्वाधिक संसर्ग पसरल्याने नागरिकांची चिंता वाढल्याने प्रशासनाने घरोघरी अॅन्टीजेंट टेस्ट करण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे झाले आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून किट्स उपलब्ध होत नसल्याने आरोग्य विभागाचाही नाविलाज झाला आहे.

एकाच दिवशी आले ४७ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत चालल्याने शहरवासियासह ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी (ता.३०) रात्री तब्बल ४६ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून शहरात गेल्या चार दिवसापासून पालिका कर्मचारी, व्यापारी, हॉटेल चालक, कामगार व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याने चार दिवसात तब्बल १४८ एक जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान २७ जून ते २७ जूलै या एक महिन्यात १४७ रुग्णांची संख्या होती. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

११५ जणांना मिळाला डिस्चार्ज
३५ दिवसाच्या कालावधीत २९५ रूग्ण संख्या झाली होती. सद्यस्थितीत १६७ रुग्णावर उपचार सुरू आहेत. शहरातील कोविड रुग्णालय, कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी जागा कमी असल्याने १९ बाधित रुग्णांना होम क्वारंटाइन केले गेले मात्र आता होम क्वारंटाइन करण्यासाठी निकषाची पडताळणी केली जात असल्याने ती संख्या कमी आहे. बरेच रुग्ण सोलापूर येथे उपचारासाठी गेले आहेत. कांही लोकांचा आणखी संपर्क सुरुच आहे. दरम्यान गुरूवारी पाठविलेल्या १०८ स्वॅबच्या  अहवालाची आणखी धाकधूक संपलेली नाही.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

बाधित रुग्ण संख्येने ओलांढले त्रिशतक
संसर्ग सुरू झाल्यानंतर दोन एप्रील पासुन रुग्णसंख्या सुरू झाली. पहिल्या टप्प्यात तीन, दुसऱ्या टप्प्यात सतरा तर तिसऱ्या टप्प्यात २९५ रुग्ण झाल्याने ३१३ संख्या झाली असून त्यातील चौदा जणांचा मृत्यू झाला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga Kovid Hospital is now 100 bed capacity patients crossed three hundred