esakal | धक्कादायक ! वृद्धाश्रमात कोरोनाचा शिरकाव; तब्बल एवढे वृद्ध निघाले पॉझिटिव्ह! 
sakal

बोलून बातमी शोधा

old age home.jpg
  • उमरगा तालुक्यातील धक्कादायक प्रकार - शेत शिवारात असलेल्या इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्रातही घुसला कोरोना. 
  •  पंचायत समितीतील चार कर्मचारी बाधित आल्याने २५ कर्मचारी क्वारंटाईन. 

धक्कादायक ! वृद्धाश्रमात कोरोनाचा शिरकाव; तब्बल एवढे वृद्ध निघाले पॉझिटिव्ह! 

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोनाचा संसर्ग शहर व तालुक्यातील चावीसगावात भिनला आहे. तो आता शेत शिवारात असलेल्या इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्रातही घुसला आहे. बुधवारी (ता.१६) पहाटे प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल आठ जेष्ठासह पाच कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. दरम्यान पंचायत समितीतील कृषी विस्तार अधिकाऱ्यासह चौघे पॉझिटिव्ह आल्याने तीस कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लातूर-गुलबर्गा मार्गालगत जेष्ठ समाजसेवक डॉ. दामोदर पतंगे यांनी उतारवयात जेष्ठांना आधार मिळण्यासाठी इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्र सुरू केले आहे. गेल्या २३ वर्षापासुन ते अविरतपणे सुरू आहे. त्याची वास्तुची रचनाच प्रत्येक जेष्ठांसाठी सुरक्षित व सर्व सोयीयुक्त आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव नव्हता. परंतू सोमवारी (ता.१४) कांही जेष्ठांना कोरोनाचे लक्षणे जाणवू लागल्याने स्वॅब घेण्यात आला होता. त्यात आठ जेष्ठासह पाच कर्मचाऱ्यांना लागन झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय या संस्थेशी संबंधित असलेल्या एका रुग्णालयातील दोघे पॉझिटिव्ह आले. आठ जेष्ठांना पुढील तपासणी व उपचारासाठी येथील कोविड रूग्णालयात सोमवारी दुपारी नेण्यात करण्यात आले आहे. या वृद्ध सेवा केंद्रात एकुण ४५ निवासी जेष्ठ नागरिक रहातात. कोरोनाचा संसर्ग झाल्याने मंगळवारी (ता.१६) उर्वरीत जेष्ठांचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्यांचा अहवाल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त होईल.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी  क्वारंटाईन
चायत समितीतील कृषी विस्तार अधिकारी, रोखपाल, लिपीक व एक शिपाई बाधित आढळून आल्याने मंगळवारपासुन जवळपास तीस कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत, त्यातील २३ कर्मचाऱ्यांनी मंगळवारी स्वॅब तपासणीला दिला आहे. हा अहवाल बुधवारी रात्री उशीरा प्राप्त होईल. दरम्यान ऑगस्ट महिन्यात पंचायत समितीतील सर्व कर्मचाऱ्यांचे अन्टीजेन तपासणी करण्यात आली होती, त्यात सर्वांचा अहवाल निगेटिव्ह होता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

" जेष्ठ नागरीकांसाठी सर्व सोयीयूक्त वृद्ध सेवा केंद्र सुरू केले. अत्यंद नियोजनबध्द पद्धतीने सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वास्तुची रचना आहे ; तरीही कोरोनाच्या काळात वृद्ध सेवा केंद्र व्यवस्थापनाने सर्वांची काळजी घेतली मात्र संसर्ग कोठून आला माहिती नाही. केंद्रात जेष्ठांना शारीरिक,मानासिक स्वास्थासाठी नेहमी विविध उपक्रम घेतले जातात. बाधित जेष्ठांवर योग्य उपचार करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.-

डॉ. दामोदर पतंगे, प्रमुख-इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्र. 

(संपादन-प्रताप अवचार)