
ग्रामपंचायत निवडणूकीच्या वार्डनिहाय मतदारसंघात एका, एका मतासाठी घासाघीस होते. तेंव्हा पोस्टल मतदान विजयासाठी पूरक ठरते. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या व स्थानिक मतदार यादीत नाव असलेल्या पोस्टल मतदानाची सुविधा असते.
उमरगा (औरंगाबाद) : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सोमवारी (ता.चार) नामनिर्देशनपत्र माघार घेण्याची सर्वांना प्रतिक्षा लागली आहे. दरम्यान गावपातळीवर मतदार याद्याचे इच्छुक उमेदवार, गावपुढाऱ्याकडून अवलोकन सुरू असून परगावी असलेले आणि कोरोना काळात गावाशी संपर्क आलेल्या मतदारांना मतदानासाठी आवर्जून आमंत्रण दिले जात आहे. पोस्टल मतदानाची सुविधा केवळ निवडणूक ड्युटी कर्मचाऱ्यांना आहे.
मराठवाड्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या ४५३ वार्डासाठी निवडणूक होत आहे. एकूण ९० हजार ७८१ मतदार संख्या असून त्यात स्त्री मतदार संख्या ४२ हजार ६५३ तर पुरुष मतदार संख्या ४८ हजार १२७ आहे. २८ नामनिर्देशनपत्र अवैध झाले असून एक हजार २४२ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. अतिरिक्त आणि अपक्ष उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र माघार घेण्यासाठी गावपातळीवर विनवणी केली जातेय.
हे ही वाचा : Gram Panchayat elections : औसा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक पत्नीसह ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात
पोस्टल मतदानही ठरेल विजयासाठी पूरक !
ग्रामपंचायत निवडणूकीच्या वार्डनिहाय मतदारसंघात एका, एका मतासाठी घासाघीस होते. तेंव्हा पोस्टल मतदान विजयासाठी पूरक ठरते. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या व स्थानिक मतदार यादीत नाव असलेल्या पोस्टल मतदानाची सुविधा असते. मात्र ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेचा कालावधी कमी असल्याने ही प्रक्रिया राबविणे क्लिष्ट होईल म्हणून निवडणूक आयोगाचे याबाबतचे अद्याप स्पष्ट आदेश नाहीत. दरम्यान बऱ्याच गावातील मतदार सैन्यदलासह अन्य विभागात कार्यरत आहेत, त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गावापर्यंत येण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधा असावी असा काही जणांचा मतप्रवाह आहे.
हे ही वाचा : कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली पाहणी
'बिनविरोध' साठी बैठकावर बैठका !
पळसगांव, कोळसूर (गुंजोटी), मातोळा या तीन ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. गत निवडणूकीत बिनविरोध आलेल्या बोरी, सुपतगांव, कराळी, रामपूर, जगदाळवाडी, दाबका, एकोंडी (जहागीर), हंद्राळ या ग्रामपंचायतीसाठी एकूण जागेपेक्षा दुपटीने अर्ज दाखल झाल्याने बिनविरोधचा प्रयत्न होऊ शकला नाही, तरीही गावपातळीवर बिनविरोधसाठी बैठकावर बैठका होत असून त्यात कितपत यश मिळेल, हे सोमवारी दुपारी तीन नंतर स्पष्ट होईल. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर ग्रामपंचायत सर्वांच्या समन्वयातून बिनविरोध काढण्याच्या हालचाली सुरू आहेत.
'ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पोस्टल मतदान प्रक्रिया ही केवळ निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यांना निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणूक चिन्ह वाटपानंतर साधारणत: आठ ते नऊ जानेवारीपर्यंत मतपत्रिका तयार होईल, त्यानंतर अर्ज प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतपत्रिका पाठवण्यात येईल.
- संजय पवार, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी