Corona-virus : उमरग्यात शनिवारपासून लॉकडाउन..! वाचा कोणी दिले संकेत..

अविनाश काळे
Tuesday, 21 July 2020

संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे 

उमरगा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही जबाबदारीने काम करत स्वतःचा प्रभाग, वार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वार्डात स्वंयसेवकाची नेमणूक करुन होम टू होम कुटुंबातील लोकांची चौकशी करुन संशयितांना आरोग्य सुविधा देण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. तरच शहरातील कोरोनाचा संसर्ग वेळेत आटोक्यात येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंढे यांनी केले. दरम्यान लॉकडाउनच्या बाबतीत झालेल्या चर्चेनंतर शनिवारपासून (ता.२१) लॉकडाउन करण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सभागृहात मंगळवारी (ता. २१) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक सूचना केल्या. या वेळी आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, युवा सेनेचे किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. उदय मोरे, आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत मोरे आदींची उपस्थिती होती.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

बैठकीत प्रारंभी उपाययोजना संदर्भात नगरसेवकांचे म्हणने ऐकून घेण्यात आले. जेष्ठ नगरसेवक अतिक मुन्शी यांनी प्रशासनासोबत राहून काम करण्याची भूमिका स्पष्ट केली. नगरसेवक पंढरीनाथ कोणे यांनी शहरात निर्जुंकीकरणासाठी औषध फवारणी वारंवार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवक संजय पवार, विक्रम मस्के, एम.ओ. पाटील, संदिप चव्हाण, संविधान मंचचे अशोक बनसोडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे, दिलीप भालेराव, अनिल सगर आदींनी बैठकीत विविध मुद्दे मांडले. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

जिल्हाधिकारी मुधोळ- मुंढे यांनी नगरसेवकांना कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी जबाबदारीची जाणीव करुन दिली. आपापल्या वार्डात बाहेरून आलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाते का? एखाद्या कुटुंबातील आजारी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्याविषयी विचारपुस केली जाते का? असे प्रश्न उपस्थित करून नगरसेवकांनी प्रशासनाकडून होणाऱ्या उपाययोजनापेक्षा स्वतःहुन कांही तरी केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

बाहेरून आलेल्या व्यक्तीला मस्जिदमध्ये क्वारंटाईन करा अथवा वार्डातील एकादी रिकामी इमारत ताब्यात घ्या, तेथे कांही दिवस नागरिकांना ठेवा. लक्षणे असल्यास रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न करा. स्वंयसेवक तयार करून वार्डात ऑक्सिमीटरद्वारे तपासणीची संख्या वाढवा अशी सूचना केली. दरम्यान आमदार चौगुले यांनी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत असल्याचे सांगून आता लोकप्रतिनिधींनी सक्रिय होऊन काम करण्याची गरज आहे, पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे असे आवाहन केले.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

लॉकडाउनचे दिले संकेत
शहर व परिसरात वाढलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुधोळ- मुंढे यांनी लॉकडाउनच्या मागणीबाबत चर्चा केली. नगरसेवकांनी तशी सहमती दर्शवली. शनिवारपासून लॉकडाउन सुरू होईल असे संकेत त्यांनी दिले.

(संपादन : प्रताप अवचार )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umrga city next Saturday start to lockdown