Good News : उमरग्यासाठी शनिवारचा दिवस दिलासादायक, ४८ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह

अविनाश काळे
Saturday, 25 July 2020

गुरूवारी (ता. २३) पाठविलेल्या सर्व ४८ जणांचे अहवाल शनिवारी (ता.२५) निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आत्तापर्यंत ७१ जणांना डिस्चार्ज मिळाला असून कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी सुरू ठेवलेल्या रुग्णसेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळतोय.

उमरगा (उस्मानाबाद) : येथील कोविड रुग्णालयातुन बुधवारी (ता.२२) पाठविण्यात आलेल्या ऐंशी स्वॅब पैकी दोघांचे अहवाल शुक्रवारी (ता. २४) पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरूवारी (ता. २३) पाठविलेल्या सर्व ४८ जणांचे अहवाल शनिवारी (ता.२५) निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आत्तापर्यंत ७१ जणांना डिस्चार्ज मिळाला असून कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी सुरू ठेवलेल्या रुग्णसेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळतोय.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

शहर व तालुक्यात २७ जुनपूर्वी सतरा पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर बाधितांच्या संख्येत वाढ झाली, मात्र गेल्या दोन दिवसात बाधितांची संख्या कमी झाली आहे. शुक्रवारी ८० पैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शनिवारी सर्वच ४८ अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकामध्ये असलेल्या भितीचे वातावरण थोडे कमी झाले आहे. दरम्यान शुक्रवारी पाठवलेल्या ७६ स्वॅबचा अहवाल रविवारी प्राप्त होईल त्यात पालिकेच्या ४० कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीला घेण्यात आले आहेत.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

आरोग्य कर्मचाऱ्याने घेतला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय
कोविड रुग्णालयात अत्यंद जोखीमेतून डॉक्टर्स, कर्मचाऱ्याकडून रुग्ण सेवा सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत काम करताना तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. सर्वप्रथम संदीप दत्ताञय वाघमारे या कर्मचाऱ्याला बाधा झाली होती. या कर्मचाऱ्यावर रुग्णालयीन कोव्हिड- ९ चा तालुकास्तरीय दैनंदिन अहवाल तयार करणे, वरिष्ठांना दैनंदिन माहिती वेळेत देणे, दैनंदिन स्वॅब लिस्ट तयार करुन तपासणीसाठी सर्व रुग्णांची अद्ययावत माहिती देऊन पाठविणे, अहवाल पॉझिटीव्ह आला तर संबंधीताच्या संपर्कातील लोकांना संपर्क करणे इत्यादी कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

श्री. वाघमारे महिन्यातून चार ते पाच दिवस सुट्टी घेऊन अविरत काम करत होता. घरी दिड वर्षाची मुलगी बाबा कधी येणार अशी सतत फोनवर बोलत होती परंतू घरी जाणे शक्य नसल्याने तिचे फोनवरूनच सांत्वन करुन दररोजचा दिवस जात होता. या काळात ३० जुनला अचानक ताप आल्याने कोरोनाची तपासणी केल्यानंतर श्री. वाघमारेचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दहाव्या दिवशी निगेटिव्ह होऊन त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

पुढे चौदा दिवस विलगीकरण होऊन २२ जुलैला पुन्हा आरोग्य सेवेत रुजू होऊन तो  खरा कोरोना योध्दा झाला. वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे यांच्या हस्ते श्री. वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. वाघमारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहवानाला साद देत प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umrga city Saturday good news 48 swab test is negative