शिवरायांच्या विविध पैलूचे झाले दर्शन, शब्दसह्याद्री वक्तृत्व स्पर्धा  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

  • शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी, व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे, शब्दसह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा नुकतीच पार पडली.
  • सकाळ यिन प्रतिनिधींचाही हिरीरिने सहभाग. 
  • राज्यभरातील 150 विद्यार्थी- .युवकांचा सहभाग. 

औरंगाबाद : शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी, व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे, शब्दसह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा नुकतीच पार पडली. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. राज्यभरातून १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पहिल्या फेरीत आपला आवडता विषय स्पर्धांकांनी मांडला. या फेरीतून एकूण ७० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरीत 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे ७१ पैलू' या विषयावर स्पर्धकांनी आपले मत मांडले. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे यंदा उत्कृष्ठ श्रोता स्पर्धा हा विषय देखील महत्त्वाचा ठरला. प्रा. साई महाशब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सकाळ यिन प्रतिनिधी यांनी पर्यवेक्षक म्हणून स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहास डोळ्यासमोर उलघडला.   

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

श्रोत्यांसाठी आयोजित केलेली पहिली व एकमेव स्पर्धा होती. यात श्रोत्यांचा व परिक्षकांचा निकाल सारखा आलेल्या श्रोत्यांना रुपये पाचशे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दसऱ्याच्या मुहूर्तावर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी अभिनेत्री साक्षी गांधी, लेखक संजय औटे, आकाशवाणी अधिकारी नम्रता फलके, प्रा. साई महाशब्दे यांची विशेष उपस्थिती होती. राज्यभरातून स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला स्पर्धकांनी त्यांची मतं सूंदर पद्धतीने मांडली. आपण वक्तृत्वाचं काहीतरी देणं लागतो या दातृत्वाच्या भावनेतुन साकारलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागला. ऋषिकेश साळूंके, शीतल संकपाळ, या सर्व शब्दसह्याद्री च्या सदस्यांनी मेहनत घेतली स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन संजय औटे यांनी तर समारोप बासरी वादनाने करण्यात आला. यिन प्रतिनिघी जालिंदर जगताप हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. तसेच आदित्य देशमुख यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अंतिम फेरीतील परीक्षकांची नावे :  
विवेक चित्ते, प्रवीण शिंदे, श्वेता भामरे, धनंजय झोंबडे, ज्ञानेश भुकेले, परिक्रमा खोत, मकरंद कुलकर्णी, रेखा चपळगावकर, भारती देशपांडे, योगेश हिवराळे

निकाल उत्कृष्ट श्रोता :
मिथुन माने, प्रसाद जगताप, अक्षय इळके, ओंकार कपळे, पूजा हिरपूरकर, विजय खांडे, सुष्मा तुळसे, दिनेश पाटील, शैलेश कोंडसकर, प्रिया गायकवाड, प्रीतम सारंग

नवोदित वक्त्यांसाठी विशेष पारितोषिक :
चिन्मयी अग्निहोत्री, तेजस्विनी सावंत, आत्मजा पांगरीकर, आर्यन सोनवणे, हर्ष कांबळे, समीक्षा सोनवणे, ऋतुजा गोरे, कस्तुरी महाजन, समृद्धी मगर, खुशी निंबकर
स्वराज्ञा इंद्राक्षे, 

शब्दसह्याद्री सर्वोत्कृष्ट वक्ता -२०२० 
रेणुका धुमाळ, अर्चना आइला, श्रुती बोरस्ते, रुपाली गिरवले, प्राजक्ता कुलकर्णी, प्रांजल कुलकर्णी, शुभम पाटील, यश पाटील, गणेश लोळगे, अक्षता खेडकर, अश्विनी सानप. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने स्पर्धेकांबरोबरच आम्हा संयोजकांचा व परिक्षकांचा प्रचंड कस कागला एवढ्या मोठ्या स्पर्धेचं संयोजन करण्याची संधी मिळाल्याने खुप आनंद झाला ,शेवटी निकालानंतर स्पर्धकांच समाधान पाहून स्पर्धा यशस्वी झाल्याची जाणीव झाली .स्पर्धेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धेकांचे मनस्वी आभार. - स्वप्नजा वालवडकर, मुख्य संयोजक.  

स्पर्धा सुंदर पद्धतीने पार पडली. पहिल्या फेरीत विषयाचे बंधन नसताना सुद्धा विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर विषय निवडले ,दुसऱ्या फेरीत शिवरायांच्या ७१ पैलू ऐकायला मिळाले जेंव्हा जेंव्हा ऐतिहासिक विषय असतो तेंव्हा त्यामाघे असणारी परिस्तिथी सांगावी लागते ती अतिशय योग्य पद्धतीने स्पर्धकांनी मांडली परंतु इतिहासाचा वर्तमानाशी असलेला संबंध मात्र फार विद्यार्थांनी लावला नाही एकंदरीत स्पर्धा यशस्वी ठरली. -विवेक चित्ते, परीक्षक  

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: various aspects of Shivaraya Darshan Shabdsahyadri competition