लातूरचे मतदार चाणाक्ष, सर्वच पक्षांना समान संधी

हरी तुगावकर
Thursday, 24 October 2019

लातूर : लातूर जिल्ह्यातील सहा  विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष दोन, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेसचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. लातूरच्या चाणाक्ष मतदारांनी या तिन्ही पक्षांना समान संधी दिल्याचे चित्र आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील सहा  विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष दोन, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेसचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. लातूरच्या चाणाक्ष मतदारांनी या तिन्ही पक्षांना समान संधी दिल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांचं नाक अद्याप शाबूत

लातूर शहर मतदार संघात १५ वी  फेरीअखेर काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी  भाजपचे शैलेश लाहोटी यांच्या पेक्षा  २२८५६ मतांची आघाडी घेतली आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या औसा मतदार संघात भाजपचे अभिमन्यू पवार यांनी १६ वी फेरीत  काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्या पेक्षा 24500 ची आघाडी घेतली आहे.

परभणीत काय झालं

उदगीर मतदार संघात राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या संजय बनसोडे यांनी 15 व्या फेरीत भाजपचे अनिल कांबळे पेक्षा 17661ची आघाडी घेतली आहे. निलंगा मतदार संघात भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 17 व्या फेरीत त्यांचेच काका काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर यांच्यापेक्षा 27230 ची आघाडी घेतली आहे.

राज्यात पुन्हा युतीच सत्तेकडे, आघाडीही शतकाकडे

अहमदपूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांनी 15 व्या फेरीअखेर भाजपचे विनायक पाटील यांच्यापेक्षा 18745 चे मताधिक्य घेतले आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघात एकतर्फी निवडणूक होत आहे. येथे काँग्रेसचे धीरज देशमुख यांनी 16 व्या फेरी आखेर 83254 चे मताधिक्य घेतले आहे. दोन नंबरवर नोटा आहे. 12 हजार पेक्षा जास्त मते नोटा ला पडले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 maharashtra result Latur